कोल्हापूर

गुणवंतांचा गौरव आज

CD

गुणवंतांचा गौरव आज
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात उद्या (ता. २९) सकाळी साडेनऊ वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी आहेत. शिवाजी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव प्रमुख पाहुणे आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव अ‍ॅड. बाबुराव भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक यांची प्रमुख उपस्थिती आहे. महाविद्यालयातील डॉ. घाळी सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील व विद्यार्थी कल्याण समितीचे प्रमुख डॉ. नागेश मासाळ यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------
प्रा. शिंदे यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुरेश शिंदे यांचा निवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार केला. प्राचार्य पंडीत पाटील अध्यक्षस्थानी होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांच्याहस्ते सत्कार झाला. गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यवेक्षक सुनिल कांबळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक विजय कांबळे उपस्थित होते. प्रा. चंद्रकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. साळुंखे यांच्याहस्ते श्री. शिंदे व पत्नी सुप्रिया शिंदे यांचा सत्कार झाला. संगीता पाटील, मधुकर शिंदे, अशोक कदम, श्रेया देवार्डे, स्नेहल रामजी, स्वाती मांगल यांची भाषणे झाली.
--------------------------------------------------------
ओंकारच्या प्रा. पोळ यांना पुरस्कार
गडहिंग्लज : येथील ओंकार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. कविता पोळ यांना कोल्हापूरच्या आनंदगंगा फौंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला. प्राचार्य शुभांगी पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात पुरस्काराचे वितरण झाले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. पुरस्काराबद्दल प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम, डॉ. काशिनाथ तनंगे, डॉ. सचिन पाटील, प्रकाश कांबळे, क्रांती शिवणे, शितल डवरी, अनिल सावरे आदींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

SCROLL FOR NEXT