कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्राची ‘कमवा व शिका’ योजना आता देशभरात

CD

‘कमवा व शिका’ योजना आता देशभरात

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; आर्थिक दिलासा मिळणार

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २८ ः गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा सातारा येथे ‘कमवा व शिका योजने’ची सुरुवात केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे सन १९६९ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठात ही योजना लागू केली. या योजनेची गरज लक्षात घेऊन आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘कमवा व शिका’ योजना प्रस्तावित केली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचण येते. ती दूर करण्याच्या उद्देशाने यूजीसीने ‘कमवा व शिका’ योजना प्रस्तावित केली आहे. शिकत असताना रोजगार उपलब्ध झाल्यास संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणातून गळती होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये समान संधी मिळावी, या उद्देशाने यूजीसीने मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर केला आहे. त्यात ‘कमवा आणि शिका’ योजना प्रस्तावित केली आहे.
..........................

शिवाजी विद्यापीठातून ८२०० विद्यार्थ्यांना मदत

शिवाजी विद्यापीठात आतापर्यंत ‘कमवा व शिका’ योजनेतून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे ८२०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत झाली आहे. त्या योजनेतून सध्या विद्यापीठात १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात ६४ मुली आणि ५६ मुले असल्याचे डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनचे रेक्टर डी. एच. भोसले यांनी सांगितले.
........

‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये समानसंधी मिळावी, यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांच्या मुसदामध्ये कमवा व शिका योजना प्रस्तावित केली आहे. ते करताना कर्मवीर अण्णा, शिवाजी विद्यापीठाने योजना कशी राबविली, याचा उल्लेख केला होता. अन्य राज्यांमध्ये या अनुषंगाने काय केले जाते, याची माहिती दिली. मसुद्याच्या आराखड्यावर सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर अंतिम मसुदा तयार होईल.

- डॉ. माणिकराव साळुंखे, अध्यक्ष, मसुदा निर्मिती तज्ज्ञ समिती
.......

‘कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतून डॉ. आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठात कमवा व शिका योजना सुरू केली. त्यात गरजू विद्यार्थ्यांना दोन किंवा तीन तास काम दिले जाते. त्यांना निवास, भोजन, आरोग्यसुविधा विनामूल्य दिली जाते. परीक्षा शुल्कात सवलत दिली जाते. या योजनेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत.

- डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
...........................

‘कर्मवीर अण्णांनी साधारणतः सन १९३५ च्या दरम्यान सुरू केलेली ‘कमवा व शिका’ योजना बहुजनांच्या शिक्षणाला बळ देण्यात वरदान ठरली आहे. त्या योजनेतून शिक्षण घेऊन महाराष्ट्र, देशाला अनेक चांगले अधिकारी, लोकप्रतिनिधी, कुलगुरू, शिक्षक मिळाले आहेत.

- डॉ. एम. बी. शेख, मॅनेजिंग कौन्सिल मेंबर, रयत शिक्षण संस्था
......................

चौकट

‘नॅक’कडून शिवाजी विद्यापीठाचे कौतुक

‘कमवा आणि शिका’ योजना देशपातळीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी यूजीसीने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली. हे महत्त्वाचे पाऊल आहे. रयत शिक्षण संस्था, शिवाजी विद्यापीठासह देशातील अन्य काही निवडक संस्थांमध्ये ही योजना यशस्वीपणे सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा सन २००० मध्ये विस्तार करून ‘मागेल त्याला काम’ अशी योजना राबविण्यामध्ये माझा सहभाग होता. या योजनेचे वेळोवेळी ‘नॅक’ने कौतुक केले आहे. यूजीसीमुळे देशातील सर्व संस्थांमध्ये ही योजना रुजण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कृतीचे महत्त्व रुजविण्यासाठी या योजनेचा वापर व्हावा’, अशी अपेक्षा ‘नॅक’चे (बंगळुरू) सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway New Timetable : मॉन्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नवे वेळापत्रक लागू होणार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! बिहारसाठी दुसरी ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस धावणार; जाणून घ्या मार्ग, थांबे आणि वेळापत्रक

सुट्टीच्या दिवशी 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता; ट्राय करा खुसखुशीत 'पालक कटलेट'

Soldier funeral: ११ महिन्यांच्या चिमुकल्यामुळे मने हेलावली! जवान अर्जुन जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप, शहापूरवर शोककळा

SCROLL FOR NEXT