कोल्हापूर

चला, उद्योग उभारू, योजनांचा आधार घेऊ

CD

चला, उद्योग उभारू,
योजनांचा आधार घेऊ - भाग -४


बीजे रूजली
उद्यमशीलतेची
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : पंखाना बळ आणि उडण्याची संधी मिळाली, तर ग्रामीण भागातील महिलाही भरारी घेऊ शकतात, याचा आदर्श बचत गटातील महिलांनी घालून दिला. विविध विभागांतर्फे राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा आधार घेत छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय उभारून यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख घडवली. जिल्ह्यातील हजारो महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नाबार्ड, सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गंत कर्जे घेत किराणा माल दुकान, पापड उद्योग, मसाला उद्योग आणि गारमेंट अशा व्यवसायातून उद्यमशीलतेचे बीज रूजवले आहे. अशाच उद्योजिकांच्या भावना त्यांच्याच शब्दात...

99372
अधिक उत्पन्न मिळविता आले
आमच्या दुर्गामाता महिला बचत गटाला १२ वर्षे पुर्ण झाली. आमच्या गटात १० सदस्या आहेत. मी स्वतः गेल्या वर्षी लोणची, पापड, चटणी, शेवया, कुरड्या, तिखट सांडगे असे उन्हाळी पदार्थ बनवते. मी पुर्वी घरगुती स्तरावर हा व्यवसाय करत होते. यंदा मात्र माविमच्या सहकार्याने मुख्यमंत्री रोजगार निधी योजनेमधून बँक ऑफ बडोदाकडून पा लाख रूपयांचे कर्ज मिळाले. यातून मशिनरीज घेतल्या. त्यामुळे मला जास्त ऑर्डर्स पुर्ण करता आल्या आणि अधिक उत्पन्न मिळवता आले.
- सविता सुतार, कळंबे तर्फ कळे

99371
स्मार्ट बाझार सुरू केला
जय जय रघुवीर समर्थ या आमच्या बचत गटाला एकूण ९ लाख ९० हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाले. गटातील प्रत्येक सदस्याने छोटा मोठा उद्योग उभारला. मी दोन लाखांचे कर्ज घेऊन स्मार्ट बाझार सुरू केला. व्यवसाय सुरू करून तीन महिने झाले चांगला प्रतिसादही मिळतो आहे.
- रेखा खुटाळे, वारणानगर, पन्हाळा

99370
स्वतःची उत्पादने सुरू करणार
बचत गट सुरू झाला तेंव्हा मिळालेल्या कर्जातून छोटी पिठाची गिरण सुरू केली. सध्या माझी सात गिरण चक्की आहेत. यंदा बचत गटाला आठ लाख ६४ हजार रूपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून गेल्या वर्षी घेतलेल्या एक लाख रूपयांच्या कर्जातून बेकरीही सुरू केली आहे. भविष्यात स्वतःची उत्पादनेही सुरू करणार आहे.
- सरिता सिसाळ, टोप

99458
आम्ही सक्षम बनलो
माझा बेकरी व पापड उद्योग आहे. ‘माविम’ने आमच्या बचत गटाला केलेल्या सहकार्यातून आम्ही महिला सक्षम बनलो आहोत. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत मला ५० हजार रूपये कर्ज घेतले. या भांडवलातूनच मी माझा उद्योग उभारला आहे.
- नसिमा मुल्ला, भादोले
(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT