कोल्हापूर

बाजार समिती निकाल

CD

...
बाजार समिती निवडणुकीचा आज निकाल

कोल्हापूर, ता. २९ : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल उद्या रविवार (ता. १) जाहीर होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्राधिकरणाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यात सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडी या दोन आघाड्यात रस्सीखेच आहे. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.
प्रथम ग्रामपंचायत मतदारसंघ, त्यानंतर व्यापारी अडते व माथाडी तोलाईदार या तिन्ही गटांची मतमोजणी होईल. त्यानंतर साडेअकरा वाजल्यानंतर विविध कार्यकारी सेवा संस्था गटाच्या मत मोजणी सुरू होईल. त्यासाठी एकूण ३६ टेबलांची मांडणी केली आहे. तसेच १५० शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. एकूण सात फेऱ्यात मतमोजणी होईल.
या निवडणुकीत उमेदवार व प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात ओळखपत्र तपासून आत सोडले जाणार आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल आणणण्यास व वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
बाजार समिती निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थेचे १४ हजार १३३, ग्रामपंचायतीतील ५ हजार ७३३, अडते व्यापारी गटाचे मतदान १२१७, माथाडी तोलाई गटाचे ८९४ मतदान आहे. यापैकी एकूण झालेले मतदान २० हजार २८० मतदान झाले आहे. तेवढ्या मतांची मोजणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT