कोल्हापूर

शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे सादरीकरण

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो 99433
...


शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे सादरीकरण

राज्याच्या शिक्षण विभागाच्यावतीने दोन दिवसीय कार्यशाळा


कोल्‍हापूर, ता.२९: जिल्‍हा परिषद शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी मागील पाच वर्षांत सातत्याने प्रयत्‍न करण्यात आले. यामुळेच पहिली ते आठवीच्या भाषा व गणित विषयात जिल्‍ह्यातील विद्यार्थ्यांची प्रगती ५ ते ७ टक्क्यांनी वाढली. याची नोंद शिक्षण क्षेत्रातील दिग्‍गज संस्‍थांनी घेतली. जिल्‍हा परिषदेने केलेल्या या कामगिरीचे सादरीकरण शनिवारी (ता.२९) मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर समग्र शिक्षण व स्‍टार प्रकल्‍प कार्यशाळेत केले. ही कार्यशाळा ॲम्‍बे व्‍हॅली (जि. पुणे )येथे शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने दोन दिवसीय समग्र शिक्षण व स्‍टार प्रकल्‍प कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेस शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित देवल, शिक्षण आयुक्‍त सुरज मांढरे, संचालक कैलास पगारे ,एससीईआरटी संचालक कौस्तुभ दिवेगावकर, तसेच राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी (माध्यमिक),शिक्षण अधिकारी (प्राथमिक) उपस्‍थित होते.

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमात जिल्‍हा परिषद शाळा डिजीटल करण्याच्या उपक्रमाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्‍हाण यांनी दिली. कागल तालुक्यातील जिल्‍हा परिषदेच्या शाळांचे १०० टक्‍के वर्ग डिजिटल करणे, अभ्यासक्रमांचे सॉफ्‍टवेअर तसेच मोबाईलच्या माध्यमातून टी.व्‍ही.वर शालेय अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे आदी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.कागल तालुक्यात केंद्रशाळा बानगे येथे कॅप्‍चर स्‍टुडीओ उभा करण्यात आला आहे. या माध्यमातून ऑनलाईन शाळा सक्षमीकरण प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT