कोल्हापूर

आवश्‍यक पत्रके

CD

फोगट यांच्या लढ्याला
कोल्हापुरातून पाठिंबा
कोल्हापूर, ता. २९ : खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंघ यांच्यावर कारवाईसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडूंना येथील महिला कार्यकर्त्यानी पाठिंबा जाहीर केला. खेळाडू मुलींच्या सुरक्षितता आणि आत्मसन्मानासाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. चित्रदुर्ग मठ येथे बैठक झाली. ज्येष्ठ कार्यकर्त्या सरलाताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. निमंत्रक ‘अंनिस’च्या सीमा पाटील होत्या. याबाबत पुढील विचार करण्यासाठी रविवारी (ता. ३०) सायंकाळी चार वाजता कार्यकर्ते मेळावा चित्रदुर्ग मठ येथे घ्यावा, असा निर्णय घेतला.
महिला खेळाडूंना अपमानास्पद आणि लज्जास्पद वागणूक देण्याच्या, त्यांची लैगिक पिळवणूक करण्याच्या वृत्तीचा निषेध करण्यात आला. महिला खेळाडूंना महिला प्रशिक्षक मिळाले पाहिजेत. तसेच खेळाडू निवडीमध्ये ज्येष्ठ महिला खेळाडूंच्या मतालाच महत्व असले पाहिजे, अशा मागण्या केल्या.
‘हा प्रश्‍न पुरुषांबद्दल अविश्‍वासाचा नाही, तर मुलींसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याचा आहे,’’ असे सरलाताई पाटील यांनी स्पष्ट केले.
देशाची मान आंतरराष्ट्रीयस्तरावर उंच करणाऱ्या खेळाडू तक्रार करत आहेत; पण केंद्र सरकार आणि त्याच्या अखत्यारीतील पोलिस खाते याबाबत ब्रिज भूषण शरण सिंघ यांच्यावर कारवाई करण्याचे टाळाटाळ करत आहे, असे चित्र दिसत आहे. हे चित्र या देशातील मुलींच्यादृष्टीने भयावह आहे. ते बदलले पाहिजे, असा सूर या वेळी व्यक्त झाला. १५ दिवसात ब्रिज भूषण यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
सभेत तनुजा शिपूरकर, सुवर्णा तळेकर, अतुल दिघे, वैशाली महाडिक, पूनम हवलदार, स्वाती काळे, गीता हसूरकर, अंजली जाधव, मंगल पोवार, विक्रम भोसले, सचिन घोरपडे आदींनी विचार मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ खेळाडू शैलजा साळोखे यांनीही पाठींबा व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin: तमिळनाडूत राजकीय भूकंप! बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पराभव; कोणत्या नेत्याकडून मिळाली हार?

Assembly election results 2026 Live Update : घुसखोरी, भारतावर होणारे हल्ले वाचवणारा विजय; बंगालमधील यशावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Emotional Video: विराट कोहलीच्या डोळ्यांत पाणी... RCB सोबत १८ वर्ष असलेल्या सदस्याला निरोप देताना भावूक... दिलं खास गिफ्ट

TMC च्या गाजावाज्याच्या पलीकडे 'मूक क्रांती'ची जादू! बंगालच्या राजकारणात RSS च्या ‘नि:शब्द रणनीती’ने कसा इतिहास घडवला?

Election Results 2026 : तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरळमध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?

SCROLL FOR NEXT