कोल्हापूर

बालाजी विद्यालयात क्रीडा शिबीर

CD

ich306.jpg
99569
इचलकरंजी : क्रीडा शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थी.
बालाजी विद्यालयात क्रीडा शिबीर
इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा शिबीराची सांगता झाली. शिबिरामध्ये अॅथलेटिक्स, योगा, बास्केट बॉल, रोल बॉल, कब्बडी, झुंबा डान्स व ट्रेकिंग अशा विविध क्रीडा प्रकाराचा समावेश होता. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना केळी, शेंगदाणे, गूळ, खजूर, असा पोषक आहार दिला. शिबिरात पाचवी ते नववीमधील ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराचे आयोजन राजेश चौगुले, उत्तम मेंगणे, रवी चौगुले, सचिन खाडे यांनी केले होते. सहभागी विद्यार्थ्यांना उपमुख्याध्यापक डी.वाय. नारायणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
---------------------
ich307.jpg
99570
इचलकरंजी : कला शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्रे काढली.

गंगामाई विद्या मंदिरमध्ये कला शिबीर
इचलकरंजी : शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा कला विकास होण्यासाठी चित्रकला व नाटय यांचे प्रशिक्षण दिले. कला शिक्षक सुरेंद्र दास यांनी मुलांना चित्रकलेतील रेखाटन, रंगभरण व नाट्य, अभिनय आवश्यक हावभाव, त्यातील बारकावे याचे मार्गदर्शन केले. सहा दिवस चाललेल्या शिबिरात मुले उत्साहात सहभागी झाली होती. उपक्रमासाठी संस्था अध्यक्षा मिना रानडे, उपाध्यक्षा प्रिती कट्टी, आर्या चांदेकर, मुख्याध्यापिका संध्या सोनवणे व शिक्षिका यांचे सहकार्य लाभले.
---------------------
मुसळे बाल विद्यामंदिरमध्ये शिबीर
इचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिरमध्ये सहा दिवसाचे बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. शिबिराचे उद्‍घाटन मुख्याध्यापिका व्ही. एस. काडे यांनी केले. शिबिरात योगासन, झुंबा, प्रार्थना, मेडिटेशन, रांगोळी, मेहंदी, क्राफ्ट, नृत्य व रोप क्लायबिंग, केशभूषा, लाठी काठी, मातकाम, गाणी व नो फ्लेम रेसिपी यांचे आयोजन केले. सुरेखा कुंभार, सागर कुंभार, डी. एम. कस्तुरे, डी. बी. टारे, व्ही. जी. वरूटे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका व्ही. एस. काडे यांनी केले. सुत्रसंचालन जे. एन. शेख व ए. आर. तराळ यांनी केले.
------------
घोरपडे नाट्यगृह खासगी करण्यास विरोध
इचलकरंजी : घोरपडे नाट्यगृह खाजगीकरण करू नये या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेतर्फे महापालिका प्रशासनास दिले. देखभाल दुरुस्ती त्यातील उत्पन्न यातून श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह भाडेतत्वावर महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे तर शहरातील संस्कृती वारसा जपण्यासाठी नाट्यगृह भाड्याने देऊ नये, असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात अनिल कदम, रामचंद्र बागलकोटे, अनिल झाडबुके, रोहित कोटकर, किरण कोल्हापूरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT