कोल्हापूर

शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव उघड ः पालकमंत्री केसरकर

CD

शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव उघड

पालकमंत्री दीपक केसरकर यांचा आरोप

कोल्हापूर, ता. २ ः ‘अजित पवार हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. हेच विधान काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावरून शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव होता आणि मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी जवळीक केली असे उघड झाले आहे,’ असा आरोप पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. सोमवारी (ता.१) ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी केसरकर म्हणाले, ‘वज्रमूठ ही महाराष्ट्राच्या विकासासाठी हवी, राजकारणासाठी नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील रिफायनरीबद्दल कोणते आश्वासन दिले होते व ते कसे पाळले नाही हे त्यांनी जनतेला सांगावे. समृद्धी महामार्ग, रिफायनरी प्रकल्प, मेट्रो या सगळ्या विकास प्रकल्पांना उद्धव ठाकरे विरोध करत आहेत. राज्यात विविध विकास प्रकल्पांतून रोजगाराच्या दोन लाख संधी उपलब्ध होतील, अशा वेळी राजकारणासाठी त्याला विरोध करून स्वतःची पोळी भाजण्याचा उद्योग ठाकरे करत आहेत. राज्यातील आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत आमच्यात कोणताही संभ्रम नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT