कोल्हापूर

नव्या ११ नागरी आरोग्य केंद्रांना मुंजरी

CD

नव्या ११ नागरी आरोग्य केंद्रांना मुंजरी
महापालिकेकडून जागांचा शोध सुरु; रुग्णसेवेत येणार अधिक सुलभता

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२ ः राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आणखी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांची सुविधा शहरात उपलब्ध होणार आहे. या केंद्रांसाठी महापालिका प्रशासनाकडून जागेचा शोध सुरु आहे. १५ मे पर्यंत जागा निश्चीत करण्यात येणार असून त्यानंतर या केंद्रातून आरोग्याच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. यामुळे शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांची संख्या २० वर पोहचणार आहे. परिणामी, शहरवासियांसाठी नजिकच्या काळात आरोग्य सेवा आता अधिक सुलभ होणार आहे.
यापूर्वी सहा नागरी आरोग्य केंद्रातून शहरवासियांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत होती. पण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक विविध योजना राबवताना या केंद्रांवर ताण पडत होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच नव्या तीन केंद्रांना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार आर के नगर, आसरानगर, कामगार चाळ या परिसरात या केंद्रांतून आरोग्याची सेवा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आरोग्याच्या सुविधा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आणखी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या केंद्रांसाठी जागा शोधण्याचे काम सुरु केले आहे. १५ मेपर्यंत जागा निश्चीत केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात येथे आरोग्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे अन्य आरोग्य केद्रांवरील ताण कमी होणार आहे. किंबहूना नागरिकांना आरोग्याच्या अधिक चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे. कोरोनात या केंद्रांचे महत्व अधोरेखीत झाले आहे. मुळात इचलकरंजी शहर हे कामगारांचे शहर आहे. खासगी आरोग्य सुविधांचा वाढता खर्च हा कामगारांना न परवडणारा आहे. त्यामुळे नव्या ११ आरोग्य केंद्रांची भर पडणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना हा एक मोठा आधार ठरणार आहे.
अन्य केंद्रांप्रमाणे या ठिकाणीही एक वैद्यकीय अधिकारी, एक बहुउद्देशीय कर्मचारी, एक परिचारीका, एक कक्षसेवक आणि एक शिपाई असा पाच जणांचा स्टाफ असणार आहे. त्याची भरती प्रक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी पातळीवरुन केली जाणार आहे. इतर केंद्रांप्रमाणे येथे लहान मुलांचे लसीकरण, माता-बाल संगोपन कार्यक्रम, गरोदर माता तपासणी, बाह्यरुग्ण तपासणी, विशेष तज्ज्ञांची भेट, विविध आरोग्य विषयक कार्यक्रम, महिन्यातून एकदा नेत्र तपासणी शिबीर यासारखे उपक्रम सुरु राहणार आहेत. या सुविधा नागरिकांना आता नजिकच्या परिसरातच सहज उपलब्ध होणार आहेत.
--------------
१२ ते १५ हजार नागरिकांसाठी एक केंद्र
नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी किमान १२ ते १५ हजार नागरिकांसाठी एक प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याचे धोरण आहे. त्यानुसार शहरात या नव्या ११ नागरी केंद्रांना मंजुरी दिली आहे. पुढील काळात यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT