कोल्हापूर

अरूण गांधी कोल्हापूर

CD

30476, 18642, 00007
.............

दोन दशकांहून अधिक काळ कोल्हापूरशी नाळ

अरूण गांधी यांच्या स्मृतींना उजाळाः सोनाली नवांगुळ यांनी केला पुस्तकांचा अनुवाद

कोल्हापूर, ता. २ ः महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू, अहिंसेचे पुरस्कर्ते अरूण गांधी यांची दोन दशकांपूर्वी कोल्हापूरशी नाळ जुळली आणि ती अखेरपर्यंत कायम राहिली. आयुष्याचा शेवटचा श्वासही त्यांनी आज कोल्हापुरातच घेतला. त्यांचे अहिंसेबरोबरच सामाजिक न्यायासाठीचे एकूणच काम आणि त्यांच्याविषयीच्या स्मृतींना आज पुन्हा उजाळा मिळाला.
...

दोन पुस्तकांचे अनुवाद

श्री. गांधी यांच्या ‘लिगसी ऑफ लव्ह'' आणि ‘गिफ्ट ऑफ ॲंगर'' या इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद कोल्हापूरच्या प्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केला आहे. साधना प्रकाशनातर्फे ‘वारसा प्रेमाचा‘ व ‘वरदान रागाचे‘ ही पुस्तके मराठीत प्रसिध्द झाली असून ती आजही वाचकप्रिय आहेत. ‘आपल्या आजोबांच्या जगण्यातली मूल्ये आणि तत्त्वे स्वत:च्या जगण्यात उतरवत डॉ. गांधींनी पत्रकारिता, संपादन, सामाजिक कार्यासाठी आयुष्यभर झपाटून काम केले. त्यांची आठहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या दोन पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याची संधी मला मिळाली. खेड्यातील साध्या माणसाचं जीवनमान उंचावावं, जातीविषयक भेदाभेद कमी व्हावा यासाठी ते आपल्या संस्थांच्या माध्यमातून कार्यरत होते. गांधी कुटुंबात जन्माला आलेल्या माणसाचे अनुभव थेट ऐकायला आणि वाचायला मिळणे हा आयुष्यात कमावलेला खूप मोठा ऐवज असल्याचे सोनाली यांनी सांगितले.
...

‘अवनि‘ संस्थेत वाढदिवस

श्री. गांधी फेब्रुवारीमध्ये ‘अवनि’ संस्थेला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावली आणि येथेच त्यांच्यावर उपचार सुरू झाले. दरम्यान, गेल्याच महिन्यात त्यांचा ८९ वा वाढदिवस संस्थेत साजरा झाला होता. संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्यासह आर्किटेक्ट शिरीष बेरी, डॉ. विवेक हळदवणेकर, डॉ. सुजाता खोत, डॉ. मंजुळा पिशवीकर आदी यावेळी उपस्थित होते.
........
..........

‘अरूण गांधी यांचे निधन झाल्याचे समजले. ही फार दुःखद घटना असून त्यांना मनापासून आदरांजली.

- मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
...

‘अरूण गांधी यांनी महात्मा गांधी यांची मूल्ये आयुष्यभर जपली. कोल्हापूरशी त्यांचा अनेक वर्षांचा संबंध होता. महात्मा गांधींचे विचार त्यांनी देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोचवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.
- सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
....

‘अरूण गांधी स्वतःला शांती पेरणारा शेतकरी म्हणायचे. हल्ली जात आणि धर्मांवर व्देष पेरला जात आहे आणि त्यातून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शांती पेरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढायला हवी आणि ती वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
- उदय कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार
...

‘शिवाजी विद्यापीठातील रजिस्ट्रार अरूण चव्हाण हे श्री. गांधी यांचे मित्र. त्यांच्या माध्यमातूनच त्यांची कोल्हापूरशी नाळ जुळली. महात्मा गांधींचे विचार त्यांनी अमेरिकेत संस्थात्मक पातळीवर पोचवलेच, त्याशिवाय अमेरिकेतील संस्थांकडून भारतातील संस्थांना मदत मिळवून दिली.
- डॉ. प्रकाश पवार, गांधी अध्यासन केंद्र, शिवाजी विद्यापीठ
...

‘महात्मा गांधी यांच्या विचारांची जगाला सर्वाधिक गरज असतानाच त्या विचारांची धुरा वाहणारे अरुण गांधी यांचे निधन होते, हा सर्व विवेकी नागरिकांसाठी खूप मोठा धक्का आहे. गांधी विचार पुढे नेण्यासाठी अशा नागरिकांनी एकत्र येणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
- प्रा. डॉ. रुपा शहा, अध्यक्षा, दिलासा सामाजिक विश्वस्त संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT