कोल्हापूर

नाटक सामाजिक परिवर्तनाचे माध्यम

CD

gad28.jpg
00052
गडहिंग्लज : नगरपरिषद व गडहिंग्लज कला अकादमीतर्फे आयोजित बालनाट्य शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ. सतीश साळुंखे, सिद्धार्थ बन्ने, प्रा. शिवाजी पाटील उपस्थित होते.
------------------------------
नाटक सामाजिक परिवर्तनाचे माध्यम
डॉ. सतीश साळुंखे; गडहिंग्लजला बालनाट्य शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : माणूस बदलत गेला तशी कलेची संकल्पनाही बदलत गेली. रंगभूमीला रंगभूमी न म्हणता रणभूमी असे म्हटले पाहिजे. कारण ही विचारांची भूमी आहे. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. त्यामुळे नाटकातून प्रस्थापित व्यवस्थेसमोर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेखक दिग्दर्शक डॉ. सतीश साळुंखे यांनी व्यक्त केले.
येथील नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमीतर्फे मोफत बालनाट्य शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या समारोपप्रसंगी डॉ. साळुंखे बोलत होते. सिद्धार्थ बन्ने अध्यक्षस्थानी होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या लोकांबद्दल नाटकातून बोलले पाहिजे. अन्यथा नाटक व्यर्थ म्हणावे लागेल. नाटकातून सामाजिक विचार उभा राहिला पाहिजे.’
कला अकादमीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. समृद्धी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरोज शिंदे यांनी आभार मानले. डॉ. निलेश शेळके, किरण चव्हाण, डॉ. संभाजी जगताप, उर्मिला कदम, अरुण पाटील, सारिका पाटील, संतोष देसाई, प्रशांत बाटे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, शिबीर तीन दिवस चालले. यात ३५ बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. डॉ. साळुंखे यांनी अभिनय, नाट्यतंत्र, कल्पनाशक्ती, नाटक समजून घेण्यासाठी विविध खेळ, वाचिक अभिनय याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT