कोल्हापूर

नागरीक सुखरुप परतण्याच्या मार्गावर

CD

नागरीक सुखरुप परतण्याच्या मार्गावर
सुदानमध्ये जिल्ह्यातील ५० होते अडकले; आमदार आवाडेंचे प्रयत्न
इचलकरंजी, ता. २ ः दक्षिण आफ्रिकेतील सुदान देशामध्ये नोकरीच्या निमित्ताने अडकलेले कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर व परिसरातील सात जणांसह ५० जण मायदेशाकडे सुखरुपपणे परतण्याच्या मार्गावर आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे विशेष प्रयत्न केले होते. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊन या नागरिकांना सुरक्षितपणे देशात आणले जात आहे.
सुदान येथे लष्कर आणि निमलष्करी दलातील संघर्षामुळे युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नागरिक नोकरीच्या निमित्ताने सुदान येथे आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५० जणांचा समावेश असून त्यापैकी इचलकरंजीतील सात जण आहेत. त्याचबरोबर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील बरेच नागरिक सुदान येथे अडकले होते. यातील अनेकजण सुदानमधील कॅनोन शुगर कंपनीत नोकरीस आहेत. युध्दाची तीव्रता वाढत चालल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संदर्भात शनिवारी संजय बिरणगट्टी या युवकाने आमदार आवाडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत तेथील माहिती देऊन कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याची तजवीज करण्याची विनंती केली होती. या संदर्भात तातडीने आमदार आवाडे यांनी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या मार्फत सुरू असलेल्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना सुरक्षितपणे मायदेशी आणावे, यासाठी संपर्क साधत माहिती दिली. तसेच तातडीने जिल्ह्यातील संबंधित नागरिकांचे पासपोर्ट क्रमांक आणि इतर माहिती घेऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला.
आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना यश मिळून सुदान येथील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने आवश्यक बसेसची तजवीज करुन सर्वांना कॅनोन शुगर फॅक्टरी येथून १२००किमीवरील पोर्ट सुदान येथे नेण्यात येत आहे. तेथून सर्वांना विमानाने जेद्दाह विमानतळ येथे नेले जाईल व तेथून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई येथे तर केरळमधील नागरिकांना बेंगलोर येथे विमानाने आणून सोडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT