कोल्हापूर

शाहू कृत्ज्ञता पूर्व

CD

लोकसहभागातून ‘कृतज्ञता पर्व’ यशस्वी करूया
जिल्हाधिकारी राहुल रेखावार ः शनिवारी जिल्हाभर मानवंदना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २ ः ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ निमित्त येत्या ६ ते १४ मे या कालावधीत शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. राजर्षींच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या शनिवारी ६ मे रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाभरात सर्वांनी शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून मानवंदना द्यावी. तसेच कृतज्ञता पर्वातील विविध उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करावेत,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांसोबत दूरदृश्‍य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, उपायुक्त रविकांत अडसूळ तसेच महसूल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलिस, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, शिवाजी विद्यापीठ यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘कृतज्ञता पर्वांतर्गत शाहू मिलमधील उपक्रमांत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, सर्व शाळा महाविद्यालये, विद्यापीठांतर्गत विभाग, महिला बचतगट, विविध संस्था, संघटना, तरुण मंडळे, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब सहभागी व्हावे. कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात होणाऱ्या अभिवादन कार्यक्रम व मानवंदना देण्याच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजन करावे.’
ग्रामीण उद्योजकांना शहराशी जोडण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा भाग म्हणून ६ ते १४ मे दरम्यान शाहू मिलमध्ये प्रदर्शन भरेल. यात कृषी, उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रांतील उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी असतील. यात गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, जान, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ, तांदूळ, मिरची, मध, काजू, रेशीम, तृणधान्य व वन उत्पादने आणि आंबा महोत्सव असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रांचा विकास दर्शविणारे व विविध शासकीय योजनांची माहिती देणारे दालन असेल. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅलिग्राफी, पेपरक्राफ्ट, माती शिल्प, चित्ररेखांकन व रंगकाम, ॲनिमेशन आदी विषयी कार्यशाळा दररोज घेण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT