कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक भरती ‘रोस्टर’मध्ये अडकली

CD

लोगो- शिवाजी विद्यापीठ

प्राध्यापक भरती ‘रोस्टर’मध्ये अडकली
शासनाला प्रस्ताव सादर करून तीन महिने उलटले; मान्यतेची प्रतीक्षा कायम

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः शिवाजी विद्यापीठातील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांच्या एकूण ७२ जागा भरण्यास राज्य शासनाने पाच महिन्यांपूर्वीच मान्यता दिली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या पातळीवरील कार्यवाही पूर्ण करून या पदांच्या बिंदूनामावली (रोस्टर) तपासणी आणि मान्यतेचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर केला. मात्र, अद्याप रोस्टर तपासणी होऊन मान्यता मिळालेली नाही. या टप्प्यावर प्राध्यापक भरती अडकली आहे.
राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांतील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदांच्या भरतीला शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला ७२ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली. त्यात सहायक प्राध्यापकांची ६२, तर सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. या पदांचे अधिविभागनिहाय रोस्टर तयार करून तपासणी, मान्यतेसाठीचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये विद्यापीठ प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागणी, मुलाखती घेऊन प्राध्यापकांच्या अंतिम निवडीची प्रक्रिया होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी उरलेले दिवस लक्षात घेता शासनाने ‘रोस्टर’ मान्यतेची गती वाढविणे आवश्‍यक ठरणार आहे. किमान जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात, तरी विद्यापीठातील अधिविभागांना प्राध्यापक मिळावेत, अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे.
....
कोट
विविध अधिविभागांतील या ७२ प्राध्यापकांच्या पदभरतीसाठीची आवश्‍यक प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने पूर्ण केली आहे. बिंदूनामावलीच्या तपासणी, मान्यतेचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये राज्य शासनाला पाठविला आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
-डॉ. विलास शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ
....
ग्राफ करावा
शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांची मंजूर पदे-२६२
रिक्त असलेली पदे-१२४
भरती होणारी पदे-७२
.....
राज्यातील इतर विद्यापीठांचीही अडचण
मुंबई, एसएनडीटी महिला विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या विद्यापीठांना एकूण ५६० इतक्या शिक्षक आणि शिक्षक समकक्षपदांच्या भरतीस मान्यता मिळाली आहे. त्यातील काही विद्यापीठांच्या ‘रोस्टर’ला अद्याप मान्यता मिळालेली नसल्याचे त्यांचीही अडचण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT