कोल्हापूर

पाणीपुरवटा बंद

CD

01980
कोल्हापूर : महापालिकेने जुना आपटेनगर येथील केंद्राजवळील गळती दुरुस्त करण्यात आली.

व्हॉल्व्ह दुरुस्तीमुळे
अपुरा पाणीपुरवठा
पाच टॅंकरच्या १८ फेऱ्यांद्वारे विविध भागांत पाणी
कोल्हापूर, ता. १० : चंबुखडी टाकीवरून येणाऱ्या मुख्य गुरुत्व वाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी बालिंगा जल उपसाकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे पाच टॅंकरच्या १८ फेऱ्यांद्वारे विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला. संपूर्ण सी व डी वॉर्डसह ए, बी. वॉर्ड, तसेच ई वॉर्डमधील काही भागांत आज पाणी आले नाही. दिवसभरात जुना आपटेनगर उपसा केंद्रावरील दोन गळती दुरुस्त केल्या. तसेच रंकाळा स्टॅंडजवळील व्हॉल्व्हमधील गळतीही दुरुस्त करण्यात आली. दुरुस्तीनंतर उपसा सुरू करण्यात आला. रात्री ज्या भागात पाणी दिले जाते, तिथे कमी दाबाने पाणी मिळेल. उद्या (ता. ११) काही उंच भागात अपुरे पाणी येण्याची शक्यता आहे.
सकाळच्या सत्रापासून पाणी आले नसल्याने अनेक भागांत नागरिकांनी टॅंकर मागवले. कसबा बावडा केंद्रावरून तीन टॅंकरद्वारे १२ ठिकाणी पाणी देण्यात आले, तर कळंबा केंद्रावरून दोन टॅंकरद्वारा सहा ठिकाणी पाणी देण्यात आले. एकूण १८ फेऱ्यांद्वारे विविध भागांत पाणी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT