कोल्हापूर

हरकत मांडली, प्रतीक्षा निर्णयाची

CD

हरकत मांडली, प्रतीक्षा निर्णयाची
वाढीव हद्द विकास आराखडा; १७८ पैकी १९ हरकतदार सुनावणीला गैरहजर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : शहराच्या वाढीव हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यावर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी दोन दिवस झाली. १७८ पैकी १९ जणांनी या सुनावणीला गैरहजर राहिले. हरकत मांडली, आता शेतकरी, नागरिकांचे डोळे अंतिम निर्णयाकडे लागले आहेत. सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्याकडे समिती अहवाल सादर करणार आहे.
हद्दवाढीनंतर दोन वर्षांनी विकास आराखडा तयार केला. २४ पैकी २२ आरक्षणे खासगी जागेवरच निश्‍चित केल्याने या आराखड्याबाबत शेतकरी व नागरिकांतून संताप व्यक्त झाला. परिणामी आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती वाढल्या. १७८ हरकती दाखल झाल्यानंतर काल (ता. ९) व आज (ता.१०) नियोजन समितीने या हरकतींची सुनावणी घेतली. नगररचना विभागाचे निवृत्त सहायक संचालक एम. टी. यादव, आर. एन. पाटील आर्किटेक्ट निशिकांत गोरुले, मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या समितीसमोर हरकतदारांनी म्हणणे सादर केले. ७० टक्के हरकती या खासगी जमिनीवरील आरक्षणे, रस्ता रुंदीकरण आणि जुना रस्ता असूनही नव्या रस्त्याला आक्षेप घेणाऱ्‍या आहेत. दोन दिवस झालेल्या सुनावणीचे नियोजन पालिकेचे नगररचना सहायक अंशूमन गायकवाड, बांधकाम अभियंता सुधीर पोतदार, निखील पाटील यांच्यासह कर्मचाऱ्‍यांनी केले होते.
-----------
शासनाच्या मान्यतेकडे लक्ष
दोन दिवसांत १५९ जणांचे समितीने म्हणणे ऐकून घेतले असून आता या सुनावणीचा अहवाल समिती तयार करेल. आराखड्यासंदर्भात गरज असेल त्या ठिकाणी शिफारशी सुचवून हा अहवाल प्रशासक तथा मुख्याधिकारी खारगे यांच्याकडे सादर करणार आहे. श्री. खारगे यांनी या शिफारशींचा अभ्यास करुन गरजेच्या ठिकाणी फेरबदल सुचवून हा आराखडा, समितीचा अहवाल आणि प्रशासक म्हणून आपले मत शासनाकडे पाठवतील. शासन स्तरावर या आराखड्याला अंतिम मान्यता मिळणार असून त्याकडे आता शेतकरी, नागरिकांचे डोळे लागले आहेत. मांडलेल्या हरकतींचा विचार होवून न्याय मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT