कोल्हापूर

शाहू मिल

CD

02023
...

शास्त्रीय, सुगम गायनातून लोकराजाला अभिवादन

माती-शिल्प कार्यशाळेला प्रतिसादः आज रंगणार ‘राजा रयतेचा‘ कलाविष्कार

कोल्हापूर, ता. १० ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष सांगतेनिमित्त आज शास्त्रीय व सुगम संगीत गायनाचा कार्यक्रम रंगला. गुणीदास फौंडेशनचे संचालक राजप्रसाद धर्माधिकारी व डॉ. अजित शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
संगीत महोत्सवात सुरवातीला डॉ. स्नेहा राजुरीकर यांनी राग ‘बिहागडा‘ सादर केला. आशय कुलकर्णी (तबला) स्वरूप दिवाण ( हार्मोनियम ) यांनी साथसंगत तर रुद्रनाथ कुलकर्णी यांचे सहगायन होते. सायली तळवळकर व सुरंजन खंडाळकर यांनी सुगम गायन सादर केले. स्वप्निल साळोखे (ॲक्टोपॅड), विक्रम पाटील (सिंथेसाईजर), केदार गुळवणी (व्हायोलिन) यांची साथ संगत लाभली. तब्बल अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाचे तितकेच आशयपूर्ण निवेदन महेश्वरी गोखले यांनी केले.
दरम्यान, आज झालेल्या माती -शिल्प कला प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी मातीपासून विविध आकारांची शिल्पे साकारण्याचा आनंद लुटला. युवा शिल्पकार सत्यजित निगवेकर यांनी घेतलेल्या शिल्प कौशल्यांबाबतच्या कृती शिबीरात मुले दंग होवून गेली. सुप्रिया निगवेकर, चेतन चौगले, सर्जेराव कांबळे प्रकाश व्हरांबळे यांनी सहकार्य केले. पालकांनीही शिल्पकलेच्या विविध प्रतिकृती बनवण्याचा आनंद लुटला. महोत्सवात उद्या (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देणारा सुमित साळुंखे दिग्दर्शित ‘राजा रयतेचा’ हा नृत्य, संगीतमय कलाविष्कार सादर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT