कोल्हापूर

आवश्यक- संक्षिप्त

CD

02379

प्रा. चंद्रकुमार नलगे यांचा
जीवनगौरव पुरस्काराने गौरव

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांना दोन जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ''विंदा करंदीकर जीवन गौरव'' पुरस्काराने त्यांचा २७ फेब्रुवारीला उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गौरव झाला. मुंबई येथील ''पीपल्स आर्टस् सेंटर'' या संस्थेतर्फे राजर्षी छत्रपती शाहू जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रा. नलगे यांची आजअखेर ९७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्य सेवेची नोंद जगातील तेरा ''हुज हू'' ग्रंथामध्ये घेण्यात आली आहे. तीन राज्यांतील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. वयाच्या नव्वदीतही त्यांचे अखंडपणे लेखन सुरू आहे.
...........
फोटो येणार आहे
हिंदू एकता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षपदी देसाई
कोल्हापूर ः येथील हिंदू एकता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक देसाई यांची निवड झाली. कऱ्हाड येथे झालेल्या बैठकीत ही निवड झाली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक पावसकर, विक्रम पावसकर, शहराध्यक्ष गजानन तोडकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष पोतदार, हिंदूराव शेळके, अजित तोडकर, आनंदा कवडे, वैभव कवडे, अर्जुन आंबी, प्रवीण चौगले, पद्माकर राऊत, चंद्रकांत बराले, विलास मोहिते आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT