कोल्हापूर

गोकुळ अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळेंचे नाव निश्‍चित

CD

‘गोकुळ’ अध्यक्षपदासाठी
अरुण डोंगळेंचे नाव निश्‍चित


नेते, संचालकांचे एकमत : विश्‍वास पाटील यांचा बुधवारी राजीनामा

कोल्हापूर, ता. १४ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघात अध्यक्षपदासाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. यावर सर्व नेते आणि संचालकांनी एकमताने डोंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यमान अध्यक्ष विश्‍वास पाटील हे बुधवारी (ता. १७) आपल्या पदाचा राजीनामा देतील. त्यानंतर आठ दिवसांनी डोंगळे यांची निवड केली जाणार आहे.
गोकुळ शिरगाव येथील ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी.पाटील, ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सर्वानुमते अरुण डोंगळे यांचे नाव गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निश्‍चित केले. त्यानंतर संचालकांशी चर्चा झाली. यामध्ये संचालकांनीही एकमताने डोंगळे यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे बुधवारी (ता. १७) विद्यमान अध्यक्ष विश्‍वास पाटील हे राजीनामा देतील. त्यानंतर आठ दिवसांनी श्री डोंगळे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल. दरम्यान, दोन वर्षापूर्वी १४ मे ला विश्‍वास पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यानंतर दोन वर्षे श्री. डोंगळे यांना दिले जाणार होते. ठरलेल्या पॅटर्ननुसार श्री डोंगळे या पदाचे दावेदार आहेत. त्यानुसार सर्वांनीच त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. शेवटच्या वर्षी कोणाला अध्यक्षपद मिळणार हे मात्र लक्षवेधी ठरणार आहे.
.....

एक महिन्यापूर्वीच चर्चाः विश्‍वास पाटील

‘अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने एक महिन्यापूर्वीच वरिष्ठ नेत्यांना भेटून राजीनामा देण्याबाबत चर्चा केली होती. नेत्यांनी दाखवलेल्या विश्‍वासाबदद्ल मी समाधानी आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीमुळे बैठक पुढे ढकलली होती. नेत्यांनी दिलेल्या नियोजनानुसार ठरलेल्यावेळी राजीनामा देत असल्याचे विश्‍वास पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT