कोल्हापूर

फळांच्या राजाची आवक वाढली

CD

02781
गडहिंग्लज : फळबाजारात स्थानिक आंब्याची आवक वाढली असुन खरेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

फळांच्या राजाची आवक वाढली
बिन्सची मागणी घटली; लिंबू, कलिंगड स्थिर, गवार वधारली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : येथील फळबाजारात गेल्या दोन महिन्यापासून आवक सुरु झालेल्या फळांच्या राजा आब्यांची स्थानिक आवक वाढली आहे. परिणामी, कोकणातील हाफूस आंब्याचे दर थोडे कमी झाले आहे. यात्राचा हंगाम संपत आल्याने बिन्सची मागणी घटली. त्यामुळे दर दहा किलोमागे दोनशे रुपयांनी कमी झाला. वळीव पावसामुळे वातावरणात दिलासा मिळाल्याने लिंबू, कलिंगडाचा दराचा चढता आलेख स्थिर झाला आहे. जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे म्हैंशी, बैलजोड्या यांची तुरळक असून असुन शेळ्या मेंढ्याची आवकही कमी होऊन उलाढाल कमी झाली आहे.
मार्चपासून कोकणातील हाफूस आंब्याची आवक सुरु झाली. पण, दोन महिन्यानंतरही आवक न वाढल्याने दर चढेच राहिले. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हाफूस आंबा सामांन्यांपासून दुरच होता. गेल्या आठभरापासून स्थानिक आंब्याची आवक वाढली आहे. कोकणातूनही अपेक्षेसारखी आवक नसल्याने दर अधिकच आहेत. स्थानिक आवक वाढल्यानंतरच आंब्याचे दर कमी होणार असल्याचे विक्रेते गजानन कांबळे यांनी सांगितले. हाफुस ३५० ते ५०० तर कर्नाटक २०० ते ३५० रुपये डझन असा दर आहे. डाळींब, पेरू, चिक्कू, माल्टा यांची आवक कमीच असल्याने दर अधिक आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामीण भागातील यात्रामुळे बिन्सचा भाव वधारला होता. यात्रा संपत आल्याने दर पुर्ववत झाला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पालेभाज्या, कोथिंबिर यांची जेमतेम आवक आहे. लगतच्या कर्नाटकातील ही आवक सुरु आहे. कोथिंबिर शेकडा पेंढी १५०० तर किळकोळ १५ रुपये पेंढी असा दर आहे. हिरवी मिरची, ढब्बू, दोडका, कारली यांचे भाव स्थिर आहेत. टोमॅटो, कोबी, वांगी यांची अधिक आवक टिकून आहे. जनावरांच्या बाजारात उन्हाळ्यामुळे एप्रिलपासून सर्वच आवक मंदावली आहे. केवळ स्थानिक यात्रा, धार्मिक कार्यक्रमामुळे शेळ्या मेंढ्याना मागणी होती. म्हैशींची सुमारे ५०, बैलजोंड्याची २५ तर शेळ्यामेंढ्याची ७० हुन अधिक आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
------------------
चौकट..
अननस दाखल
फळबाजारात कर्नाटकातून अननस दाखल झाला आहे. उन्हाळ्यामुळे त्याला मागणीही आहे. नगाच्या आकारानुसार १५ ते २५ रुपयापर्यंत दर आहे. तोतापूरी आंब्याची आवक कायम आहे. नगाला पाच ते दहा रुपये दर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT