कोल्हापूर

गाव तलावातील अतिक्रमणं निघणार

CD

(चला गाव तलाव वाचवूया... लोगो)


जिल्‍हा परिषद ... लोगो
...

गाव तलावातील अतिक्रमणे निघणार

कालबध्द कार्यक्रम करण्याचे निर्देश ःकुचराई केल्यास ग्रामपंचायतीवर कारवाई

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५: जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत ४५४ गाव तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र बहुतांश तलावांत अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमणे काढण्याचा कालबध्द कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश सर्व गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत. दिलेल्या वेळेत गाव तलावातील अतिक्रमण काढण्यास ज्या ग्रामपंचायती कुचराई करतील, तेथील सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत ग्रामपंचायत विभागाने दिले आहेत.

जिल्‍ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत १९७२ सालच्या दुष्‍काळात गावागोवी गाव तलाव काढण्यात आले. या तलावांनी त्यावेळी गावांची तहान भागवली. गावांच्या सौंदर्यात भर घातली. भूजल पातळी वाढवण्यात या तलावांचे मोठे योगदान आहे. मात्र आज यातील अनेक तलाव सांडपाण्याचे डबके बनले आहे. गावातील सर्व गटर्स तलावात सोडण्यात आल्या आहेत. काही गावांनी हे तलाव मुजवले आहेत. काहींनी या ठिकाणी मैदान तयार केले आहे. तर तलावाच्या आजूबाजूला राहणाऱ्या‍ लोकांनी या तलावातच अतिक्रमण केले आहे. कोणी सभागृह बांधण्यासाठी तर कोणी समाज मंदिर बांधण्यासाठी गाव तलावांची मागणी करताना दिसत आहे.

पाण्याचा महत्‍वाचा स्‍त्रोत असणारे गाव तलाव आज मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहेत. त्यामुळेच त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. एका बाजूला गाव तलावांची दयनीय असताना, काही गावांनी तलावांची संस्‍कृती जपण्याचे काम केले आहे. तलावाची नियमित साफसफाई, गार्डन, फूटपाथ तयार करुन या तलावाचे सौंदर्य आणखीच खुलवले आहे. या तलावात अतिक्रमण होणार नाही, तलावाचे प्रदूषण होणार नाही, अशी खबरदारी घेणाऱ्या देखील काही ग्रामपंचायती आहेत. मात्र यांची संख्या कमी आहे. जिल्‍हा परिषद, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून त्यांनी गावाचे गाव तलाव संवर्धन करण्याचे काम केले आहे. त्यामुळे गाव तलाव जपणाऱ्या या गावांचा सन्‍मान करतानाच ज्यांनी दुर्लक्ष केले आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धोरण जिल्‍हा परिषद राबवण्याच्या मानसिकतेत आहे.
....

... तर सरपंच, सदस्यंवर अपात्रतेची कारवाई

सार्वजनिक गाव तलावांमध्ये अतिक्रमण झाल्यास ग्रामपंचायत अधिनियिम १९५९ मधील कलम ५३ तसेच महसूल व वनविभागाकडील शासन परिपत्रक ७ सप्‍टेंबर २०१० व १० ऑक्‍टोबर २०१३ मधील कारवाई करणे अपेक्षित आहे. ही अतिक्रमणे काढण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली तर सरपंच,सदस्य यांच्यावर अपात्रतेची कारवाई होवू शकते. तसेच ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशीसह पुढील कारवाई होवू शकते.
...

‘गाव तलावातील अतिक्रमणे काढण्यासाठी गटविकास अधिकारी स्‍तरावरुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गाव तलाव अतिक्रमण काढणे व स्‍वच्‍छता करण्याचे नियोजन केले जाईल. झालेल्या कामाचा आठ दिवसांनी आढावा घेतला जाईल. दिलेल्या सुचनेप्रमाणे काम न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT