कोल्हापूर

राज्य , राष्ट्रीय टेनिस स्पर्धांचे कोल्हापुरात आयोजन

CD

कोल्हापूरात उद्यापासून
राज्य , राष्ट्रीय टेनिस स्पर्धां

​कोल्हापूर, ता. १५ : ​महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन ​व कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या​ संयुक्त विद्यमाने ता १७ ते २८ मे दरम्यान राज्य आणि राष्ट्रीय लॉन टेनिस अजिंक्यपद ​स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केडीएलटीए मैदान व साठमारी मैदान येथे होणार आहेत. यामध्ये १७ ते १९ मे दरम्यान सरदार मोमीन मेमोरियल १४ वर्षाखालील राज्य लॉन टेनिस स्पर्धा तर २० ते २८ मे दरम्यान ​रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षाखालील ​राष्ट्रीय अजिंक्यपद लॉन टेनिस स्पर्धा होणार आहेत. यासाठी २०० ​हून अधिक ​खेळाडू सहभागी होणार असल्या​ची माहिती राज्य टेनिस संघटनेचे ​सचिव ​सुंदर अय्यर यांनी पत्रकार परिषदेत ​दिली.
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांबरोबर कोल्हापूर हे लॉन टेनिसचे केंद्र बनू लागले आहे. गेल्या ४ ते ५ वर्षापासून येथे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होत आहेत. यासाठीच कोल्हापूरच्या टेनिसला बळ देण्याच्या उद्देशाने राज्य अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना इतर खेळाडूंचा खेळ पहाण्याची व त्यांच्याशी स्पर्धा करण्याची संधी आहे. तयारी झाली असून, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना श्रीमंत शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बेस्ट बॉय व गर्ल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच भविष्यात सांगली, सातारा, फलटण, इचलकरंजी इथे शिबिरे व विविध स्पर्धांचे आयोजन करुन, दर्जेदार खेळाडू घडवण्याचा प्रयत्न आहे. शीतल भोसले, मेघन बागवडे, माणिक मंडलिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT