कोल्हापूर

नऊ जूनपासून मुसंडी रसिकांच्या भेटीला

CD

03277

नऊ जूनपासून ‘मुसंडी’ रसिकांच्या भेटीला
स्पर्धा परीक्षार्थींना नवप्रेरणा देणारा मराठी चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : ‘एमपीएससी’, ‘यूपीएससी‘ यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या जीवनावर आधारित ‘मुसंडी’ हा नवा चित्रपट नऊ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. स्पर्धा परीक्षांमधील यश- अपयश परीक्षार्थींच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारे असते. या स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर हा चित्रपट बेतला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या टीमने आज ‘सकाळ'' कार्यालयाला भेट दिली. यानिमित्ताने चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडला.
लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले, ‘आजवर विविध सामाजिक विषयांवर चित्रपट केले. आता ‘मुसंडी’ हा नवा चित्रपट घेवून रसिकांसमोर येत आहे. केवळ स्पर्धा परीक्षार्थीच नव्हे तर प्रत्येकाला आपल्यातील आत्मविश्वासाची जाणीव हा चित्रपट करून देईल.’
सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत या चित्रपटात रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी प्रमुख भूमिकेत आहे. राज्यभरातील तमाम तरूणाईच्या विश्वाचे हा चित्रपट प्रतिनिधीत्व करतो, असे रोहन यांनी सांगितले. यावेळी घनश्याम दराडे, सूरज चव्हाण (गुलीगत) आदी उपस्थित होते.
दरम्यान, या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तानाजी गलगुंडे, शिवाजी दोलताडे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजित मगर, मयूर झिंजे आदींच्या भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT