कोल्हापूर

पोलीस भरती

CD

12839, 12841, 12843, 12845

पाडळी खुर्दच्या चार तरुणांचे
मुंबई पोलिस भरतीत यश

बालिंगा, ता. २८: सातत्यपूर्ण अभ्यास आणि मैदानी खेळांचा न चुकता केलेला सरावाच्या जोरावर मुंबई पोलिस भरतीमध्ये पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील चार तरुण यशस्वी झाले आहेत.
विपुल विलास तानगडे, युवराज दादासाहेब पाटील, सुरज उत्तम टोणपे आणि अनिकेत शहाजी पाटील या तरुणांचा समावेश आहे.
युवराज, अनिकेत यांचे वडील शेती करतात. विपुलचे वडिल पोलिस होते. तर, सुरजचे वडिल हे सेट्रिंगचे काम करतात. चारही तरुणांनी कोरोना दरम्यान मैदानी खेळावर कष्ट घेतले. त्यामुळे पोलिस भरतीमध्ये त्यांना याचा चांगला फायदा झाला. युवराज पाटील म्हणाला, ‘वडिल शेती करतात. तरीही मैदानी खेळावर लक्ष दिले. त्यासाठी आवश्‍यक अभ्यासही केला. पाडळी खुर्दमधील अनेक तरुण पोलिस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांना चांगले वाचनालय आणि खेळाचे मैदान हवे आहे.’
विपुल तानुगडे म्हणाला, ‘घरातुनच पोलिस क्षेत्राचा अनुभव वडीलांकडून भेटल्याने लहानपणापासूनच पोलिस होण्याचे मार्गदर्शन मिळाले. मैदानी चाचणीत अव्वल होतो. लेखी परीक्षेसाठी मेहनत घ्यावी लागली.’
सुरज टोणपे म्हणाला, ‘वडील सेटिंगचे काम करतात. प्रतिकुल परिस्थितीत वडीलाना मदत म्हणून इलेक्ट्रिशनचे काम करत पोलिस होण्याचे स्वप्न बाळगले. मैदानी चाचणीत अव्वल होताच त्यामुळे होमगार्डमध्येही सेवा बजावली.’
अनिकेत पाटील म्हणाला, ‘वडील शेती करतात. लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती आणि खाकी वर्दीचे आकर्षण होते. म्हणुनच होमगार्ड सेवा बजावली. सतत मैदानी सराव व अभ्यासाची सांगड घालत हे यश मिळावले आहे.’ चौघांच्याही यशात त्यांचे आई-वडील आणि त्यांचे कुटुंबीय यांचा मोलाचा वाटा आहे. त्यासह कोल्हापूर पोलिस सतिश तानुगडे व परिक्षेसाठी सचिन इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

"मी दुनियादारी 2 करणार नाही" अखेर संजय जाधव स्पष्टच बोलले; "कदाचित सुहास शिरवळकर.."

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

SCROLL FOR NEXT