कोल्हापूर

फुलेवाडी चा बीजीएम वर एकतर्फी विजय

CD

04608

‘फुलेवाडी’चा एकतर्फी विजय 
उत्तरार्धात ‘बीजीएम’कडून प्रतिकार; मात्र गोल नोंदवण्यात अपयश

कोल्हापूर, ता. २३ : फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघाने बीजीएम स्पोर्टस् संघावर ३ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा हा सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला.  
फुलेवाडी विरुद्ध बीजीएम यांच्यातील सामना एकतर्फी ठरला. आक्रमक खेळणाऱ्या फुलेवाडी संघाने सामन्यावर वर्चस्व राखले. आक्रमक चाली रचत बीजीएम संघाच्या मध्यफळी व बचाव फळीवर दबाव आणत आक्रमण करत गोल नोंदवण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला फुलेवाडीच्या विराज साळोखे याने गोल नोंदवत संघाला १ - ० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बीजीएम संघाकडून प्रतिकार झाला. यात चांगल्या चाली रचत फुलेवाडी संघाची बचाव फळी भेदत गोलसाठी झालेले प्रयत्न फोल ठरले.
दरम्यान संकेत जरगच्या पासवर कपिल शिंदे याने हेड द्वारे मारलेला फटका गोलजाळी बाहेरून गेला, तर अनेक फटके फुलेवाडीचा गोलरक्षक रणवीर खालकर याने फोल ठरवले. सामन्याच्या ८० व्या मिनिटाला फुलेवाडीच्या चंदन गवळी याने गोलाची नोंद करत सामना २-० असा केला तर पाठोपाठ अधिकच्या वेळेत चंदन गवळी यानेच वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद करत सामना ३-० असा केला. 

चौकट
उत्कृष्ट असे
सामनावीरःचंदन गवळी : फुलेवाडी 
लढवय्या ःअभिजित साळोखे : बीजीएम 

चौकट
आजचा सामना 
सायंकाळी ४ ः दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT