कोल्हापूर

भिंतीवरील घड्याल अन्‌ वॉल घड्याल डिझाईन थीम

CD

लोगो ः बिगस्टोरी

भिंतीवरील घड्याळाची ‘टीकटीक’ कायम
्एलईडी, डिजीटल, स्मार्ट (वॉच) घड्याळे आली. मोबाईलमध्ये घड्याळ आले. तरीही भिंतीवर मात्र घड्याळ हवेच, हा आग्रह अजूनही कायम आहे. तंत्रज्ञान जसे बदलत गेले, तशी घड्याळ्यांचे रुप, आकार, रंग, अंतर्गत रचनेत काहीसे बदल होत गेले.भिंतीवर जरी घड्याळ घेतले तरी घड्याळ कुठल्यादिशेला हवे, याचेही एक वास्तूशास्त्र निर्माण झाले आहे.
-अमोल सावंत


जसे इंटिरिअर, तसे घड्याळ
तुमच्या घराची रचना जशी असते, तशा पद्धतीने कोणती घड्याळे घ्यावीत, हे इंटिरिअर डिझाईनर सांगतात. मग त्यापद्धतीने घड्याळ घेतले जाते. कोल्हापूरचा विचार केला तर अजंटा, ओरेव्हा, ऑरपॅट, सेझ, सिको, केझर, वर्ल्ड ट्रॅव्हल्स्‌, थॉमस केंट, कॉपर प्लेटींग, ॲल्युमिनिअर/कॉपरची रचना असलेली, ओक वुड, सॉफ्ट वुड, बझर, गिअर सिस्टम, कुक, ड्युएल सिस्टम, हँगीग वॉल, लंडन म्युझिक, कॅसल म्युझिक, एलईडी, डिजीटल, नाईट ग्लो, पेंड्युलम, रोमन, सिंपल आकडे, कॅलीबर आकडे असलेली घड्याळे उपलब्ध आहेत. यातील क्वार्टझची रचना असलेल्या घड्याळांना ग्राहकांकडून अधिक मागणी असते. तसेच इथनिक ब्रँड, ॲटीक पीस असलेली घड्याळे घेणारे ग्राहकही खूप आहेत. इथनिक/ ॲटीक पीस घड्याळांची किंमत मुळात १५ ते २० हजार रुपयांपर्यंत असते.

लक्षवेधी रचना
ीसर्वसाधारणपणे भिंतीवरील घड्याळाची रचना ही गोलाकार असते; पण अलिकडे चौरस, कप-बशी आकार, आयताकृती, अंडाकृती, लंबक आकार, पंचकोन, अॅबस्ट्रॅक्ट (अमुर्त) डिझाईन्सचे ट्रेंडस्‌ मार्केटमध्ये दिसतात. भिंतीच्या रंगाला अनुकूल घड्याळे घेण्याचा एक कल दिसतो. घड्याळ घरात नेकमे कुठे लावायचे, हासुद्धा एक विचार असतो. मगच घड्याळ घेतले जाते. घड्याळांमध्ये होडी, नौका, वॉर बोट, हत्ती, रेनडिअर, मोर, पक्षी, प्राणी, निसर्गातील विविध घटकांनुरुप रचना केलेली पाहायला मिळते. काही घड्याळे भारतीय बनावटीची तर काही परदेशातील कंपन्यांनी निर्माण केलेली आहेत. अशी सर्व घड्याळे आज कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत, हे विशेष. परदेशी घड्याळे ही तुलनेने महाग आहेत.


गिफ्ट म्हणूनही वापर
कुणाच्याही घरची वास्तू असते, तेव्हा गिफ्ट व्हॉऊचरमध्ये घड्याळ ठेवले जाते. प्रियजनांचीही गिफ्ट खूप लोक घरात जपून ठेवतात. जरी घड्याळ कालांतराने खराब झाले तरी आठवण म्हणून घड्याळाचा सांगाडा ठेवला जातो. कारण घड्याळ हे भरभर सुटून जाणाऱ्या काळाचे एक प्रतीक आहे. कोणत्याही घरात अशी आठवण ठेवलेली घड्याळे पाहायला मिळतात. वायडनिंग (चावीची) घड्याळे मात्र कालबाह्य झाली. यासाठी जे घड्याळ आवडते, ते दिले जाते.
...

कोट
हौसी लोक गुगल, सोशल साईटस्‌वर जाऊन घड्याळांची माहिती घेतात. एखाद्या घड्याळाची रचना आवडली की, ते घड्याळ ऑनलाईन मागवतात किंवा आमच्याकडे येतात. असे घड्याळ तुमच्याकडे आहे का? नसेल तर ते तुम्ही किती दिवसात उपलब्ध करुन देता, अशी विचारणा करतात. आम्ही दुकानात अनेक घड्याळांचे आकार, रंग, आवाज, रचना असलेले आगळीवेगळी घड्याळे भिंतीवर टांगतो. एखादे घड्याळ आवडले की, ते घेऊन जातात.
-नचिकेत काटकर

चौकट
उर्जा, स्पंदनाचे महत्व
वाड्यातील घड्याळ किंवा कॅसल म्युझिक, पेंड्युलम घड्याळाला अधिक मागणी आहे; कारण या घड्याळातून वाडा, हवेलीतून ज्या पद्धतीने टोल देत घड्याळांचा गजर होतो, तशा पद्धतीची घड्याळे आजही उपलब्ध आहेत. जेव्हा कॅसल म्युझिक घड्याळातून गजर होतो, तेव्हा अपरिचित व्यक्तिंचेही लक्ष पटकन वेधले जाते. कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये असे गजर देणारे घड्याळ आहे. जेव्हा वातावरण शांत असते, तेव्हा या घड्याळाचा आवाज खूप लांबपर्यंत ऐकायला येतो. शिवाय, या आवाजाला काहीशी गूढ डूब असते. यातून निर्माण होणारी उर्जा किंवा स्पंदने दूर अंतरापर्यंत जातात. काही सेकंद ही स्पंदने वातावरणात, परिसरात जाणवत राहतात. या उर्जा, स्पदंनाचे महत्व अपार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT