कोल्हापूर

संक्षिप्त

CD

04734

खासगी शाळांतील
मुलांनाही मोफत गणवेश मिळावेत
कोल्हापूर : राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश'' ही योजना जाहीर केली आहे. पण त्यामध्ये राज्यातील खासगी प्राथमिक शाळांचा समावेश केलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी प्राथमिक शाळांतील मुलांनाही मोफत गणवेश द्यावेत, अशा मागणीची निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगुले यांना देण्यात आले. खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. संविधानाच्या कलम चौदा व सोळा अन्वये समानतेच्या व नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारे या मुलांनाही मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष भरत रसाळे, मच्छिंद्र नाळे, आप्पासाहेब वागरे, रावसाहेब गवळी, अमोल गावडे आदींचा समावेश होता.
...........

विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान
कोल्हापूर ः गेली दहा ते बारा दिवस एका सत्तर फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याला आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याकडून जीवदान मिळाले. वडणगे (ता.करवीर) येथील एका शेतातील जुन्या पडक्या विहीरीत हा कुत्रा पडला होता. त्याच्या आवाजाने परिसरातील शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. पण, त्याला खाली जाऊन काढणे शक्य नव्हते. कुत्र्यासाठी खाद्याची व्यवस्था शेतकरी करत होते. पण, त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठीचा पर्याय सुचत नव्हता. या पार्श्वभूमीवर काहींनी श्री. कांबळे यांच्याशी संपर्क साधला. ते गिर्यारोहणातील साहित्याचा वापर करून श्री. कांबळे विहिरीत उतरले. पण, अनेक दिवस विहीरीत अडकून पडल्याने कुत्रा आक्रमक बनला होता. त्यामुळे खाली बराच काळ थांबून त्यांनी एका छोट्या बॅरलमधून कुत्र्याला अखेर सुखरूप बाहेर काढले.
.........

शाहू स्मारक व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार
कोल्हापूर ः नॅशनल इंटग्रेटेड मेडिकल असोशिएशनच्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याबाबत शाहू स्मारक व्यवस्थानपाविरोधात बुधवारी शाहू मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडे तक्रार देण्यात आली. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष डॉ. सुनील पाटील, करवीर शाखेचे अध्यक्ष डॉ. यशपाल हुलस्वार, डॉ. ऋषिकेश जाधव, डॉ. आदित्य काशीद आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT