कोल्हापूर

शिवराज्याभिषेक दिन

CD

शिवराज्याभिषेक लोकसोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

वसंतराव मुळीक : व्याख्यानमालेसह मिरवणुकीचे आयोजन

कोल्हापूर, ता. २६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या स्मृती जागविण्यासाठी मराठा स्वराज्य भवन ट्र्स्ट, अखिल भारतीय मराठा महासंघ, शाहू सलोखा मंच यांच्या वतीने शिवराज्याभिषेक लोकसोहळ्याचा भाग म्हणून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत मंगळवारी (ता. ३०) व बुधवारी (ता. ३१) शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला होईल. तर ६ जून रोजी शिवराज्यभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शाहू स्मारक भवनात व्याख्यानमाला होणार आहे. यात मंगळवारी (ता. ३०) ज्येष्ठ विचारवंत निरंजन टकले यांचे ‘शिवचरित्र आणि विनायक सावरकर’ या विषयावर व्‍याख्यान होईल. तर बुधवारी (ता.३१) रवींद्र पोखरकर (मुंबई) यांचे ‘राजर्षी शाहू, इतिहासकार जॅक्सनचा खून आणि कोल्हापूर संबध’ या विषयावर व्याख्यान होईल. दोन्ही व्याख्याने सायंकाळी साडेपाच वाजता होतील. ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण होणार आहे. ६ जून रोजी सायंकाळी ४.३० वा शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील मराठा महासंघ कार्यालय येथून सायंकाळी ४.३० वा. मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ होईल.
छत्रपती शिवराय आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेतील ‘शक्ती आणि भक्ती’चा संगम असलेल्या वारकरी मर्दानी खेळाचे पथक या मिरवणुकीत सहभागी होईल. याशिवाय झांजपथक, लेझीम ताफा, धनगरी ढोल, प्रबोधनात्मक फलक, शिवकालीन वेशभूषेतील कलावंत असणार आहेत. तसेच डॉ. अल्पना चौगुले यांनी रेखाटलेल्या राज्याभिषेकच्या चित्राच्या १००० प्रती वाटप करण्यात येणार आहेत.
यावेळी बबनराव रानगे, डॉ. संदीप पाटील, अशोक भंडारे, विजय पाटील, महेश मचले, प्रकाश पाटील, संजय कांबळे, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, प्रताप नाईक, विराज पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT