कोल्हापूर

इचल ः तालुका निर्मितीला गती

CD

इचलकरंजीला आता तालुका निर्मितीचे वेध

आरटीओ कार्यालय मंजुरीने प्रक्रीयेला गती ः नजिकच्या काळात निर्णयाची शक्यता

पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता.२६ ः इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानंतर आता इचलकरंजी स्वतंत्र तालुका होण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्यांचे विभाजन करुन नविन तालुका निर्मितीच्या हालचाली शासन पातळीवर सुरु झाल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात सात ते आठ नविन तालुके अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. यामध्ये इचलकरंजीचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे इचलकरंजी तालुका करण्यासाठी आवश्यक सर्व परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्याचे विभाजन होवून इचलकरंजी हा नविन तालुका निर्माण होण्याची मागणी नजिकच्या काळात पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोल्हापूरनंतर इचलकरंजी सर्वात मोठे शहर आहे. दहा महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे महापालिका झाली. त्यामुळे इचलकरंजीला महापालिकेचे शहर म्हणून नवी ओळख मिळाली. आता प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित राहिलेल्या स्वतंत्र आरटीओ कार्यालयास मंजुरी मिळाली. `एमएच ५१` अशी आणखी एक नवी ओळख इचलकरंजीला आता मिळाली आहे. यापुढे आता नविन काय मिळणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये इचलकरंजी नविन तालुका होणार असल्याच्या चर्चेने गती घेतली आहे. त्यानुसार शासन पातळीवर हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्यांचे विभाजन करुन नविन तालुका निर्मिती करण्यावर शासनाचा भर आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्याचे विभाजन करुन इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका करण्याच्या प्रक्रीयेला गती येत आहे. नजिकच्या काळात इचलकरंजीला आणखी एक नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुळात ही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. इचलकरंजी शहरात बहुतांशी शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे तालुक्याचे ६० टक्केपेक्षा जास्त काम इचलकरंजीतूनच चालते. हातकणंगले तालुक्याचा भौगोलिक आकार खूपच मोठा आहे. पंचगंगा नदी पलिकडील गावांना हातकणंगले तालुक्याचे ठिकाणा दळणवळणाच्यादृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे इचलकरंजी स्वतंत्र तालुका करण्याची मागणी गेल्या वीस वर्षांपासून होत आहे. तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तर आमदार प्रकाश आवाडे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेवून इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयाच्या मंजुरीनंतर त्यांची मागणी दृष्टीपथात असल्याची संकेत मिळत आहेत.
------------

हातकणंगले तालुका क्षेत्र दृष्टीक्षेप
लोकसंख्या - ८ लाख
एकूण गावे - ६२
महापालिका -०१
नगरपालिका - ०२
नगर पंचायत - १
विधानसभा मतदार संघ- २
------------

इचलकरंजीतील शासकीय आस्थापना

प्रांत कार्यालय
अपर तहसिल कार्यालय
मंडल कार्यालय
तलाठी कार्यालय
अपर पोलिस अधिक्षक कार्यालय
पोलिस उपअधिक्षक कार्यालय
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय
पासपोर्ट कार्यालय
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT