कोल्हापूर

केएमटीचा अजून तिसरा चेक

CD

आमदार फंडासाठी नाहीत पैसे?
केएमटीच्या बस रखडल्या ; कामात होत आहेत बदल, महापालिकेतील राजकारण तापू लागले

कोल्हापूर, ता. २८ ः तीनपैकी एका आमदार फंडाचा निधी अजूनही आला नसल्याने केएमटीच्या नऊ वातानुकूलित बसचा प्रवेश थांबला आहे. आमदार फंड देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत की हेतुपुरस्सर विलंब लावला जात आहे याची शहरात चर्चा सुरू आहे. त्यासाठी कॉंग्रेसच्या आमदारांनी सरकारवर ठपका ठेवला असून, याबरोबरच नगरोत्थान, दलितवस्ती योजनेतीलही कामे डावलल्याची तक्रार केली आहे. यामुळे विकासकामांमध्ये महापालिकेतील राजकारण आड येण्यास सुरूवात झाल्याचे दिसू लागले आहे.
कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्येकी एक कोटीचा आमदार फंड नऊ वातानुकूलित बससाठी दिला. त्याची पत्रे त्यांनी तातडीने दिली. त्यासाठी नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू आहे. बसची वर्कऑर्डरही देण्यात आली. मे महिन्याच्या अखेरीस बस येतील, अशी शक्यता होती. गेल्या आठवड्यापर्यंत आमदार फंडाचे धनादेशच महापालिकेकडे आले नव्हते. सरकारकडून निधी येत नसल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर दोन आमदारांचे धनादेश महापालिकेला मिळाले. पण, अजूनही एका आमदाराचा धनादेश आलेला नाही. त्यानंतर तो निधी महापालिकेकडे येऊन तिथून केएमटीकडे वर्ग होईल. धनादेश आला नसल्याने बस येण्यास वेळ लागणार आहे.
शिंदे गट व भाजपचे सरकार असताना महापालिकेला कॉंग्रेसच्या आमदारांकडून बस मिळणार आहेत ही बाब आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांना बोचू शकते. याबरोबरच नगरोत्थानमधून शंभर कोटींचा निधी रस्त्यांसाठी मंजूर केला आहे. त्यासाठी पूर्वी रस्त्यांचे प्रस्ताव महापालिकेने सादर केले होते. त्यात शहरातील महत्त्‍वाच्या रस्त्यांचा समावेश होता. त्यातील काही रस्ते बदलून दुसरे घालण्याचा प्रकार मध्यंतरी झाल्याची चर्चा महापालिकेत होती. त्यासाठी पुन्हा कॉंग्रेसकडून पाठपुरावा केल्यानंतर झालेला बदल रद्द केल्याचे समजते. तसेच दलितवस्ती योजनेतीलही कामे बदलल्याचे कॉंग्रेसच्या आमदारांनी सांगितले. या साऱ्यांच्या पाठीमागे राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्ष असल्याचे आमदारांचे मत आहे. यामुळे महापालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच राजकारण तापू लागले आहे.
..................
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हालचाली
महापालिकेत कॉंग्रेस व मित्र पक्षांची सत्ता होती. त्यांच्याकाळात मंजूर केलेल्या अमृत योजना, नगरोत्थान योजना यातील कामांची उद्‍घाटने कॉंग्रेसच्यावतीने केली जाऊ लागली आहेत. थेट पाईपलाईन योजनेचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यात तेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान महापालिका निवडणूक होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे राजकीय पातळीवरील हालचाली वेगावण्यास सुरूवात झाली आहे.
...........
कोट
बसची कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन आमदारांचा निधी आला आहे. आणखी एक धनादेश प्रक्रियेत असल्याचे समजते. तो सर्व निधी आल्यानंतर ९ बसचे पैसे दिले जाणार आहेत. त्यासाठी काही वेळ लागू शकतो.
-संजय सरनाईक, प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक, केएमटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT