कोल्हापूर

बांधकाम कायमस्वरूपी बंद करा

CD

सुशोभिकरणाचे काम कायमस्वरूपी बंद करा
इचलकरंजी मराठे मिल कॉर्नर परिसरातील नागरिकांची मागणी
इचलकरंजी, ता. ३१ : येथील मराठे मिल कॉर्नर येथे मुख्य रस्त्यावर मध्यभागी सुशोभिकरणाच्या नावाखाली होत असलेल्या बांधकामामुळे परिसरातील रहिवाशी, व्यावसायिक व वाहतुकदारांना त्रास होणार आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबवून कायमस्वरूपी बंद करावे, अशी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना दिले.
परिसरात धान्य लाईन ही व्यापारी पेठ आहे. येथे सतत मोठ-मोठे ट्रक या रस्त्यावर परिसरामध्ये उभारलेले असतात. या मार्गावरून वाहनांची व नागरिकांची रेलचेल सुरू असते. तसेच येथे फार पूर्वीपासून रिक्षास्टॉपही आहे. अनेक लहान मोठी व्यापारी आस्थापने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मध्यभागी सातत्याने वाहनांचे पार्किंग केलेले असते. या सर्व परिस्थितीमुळे येथे अनेकदा अपघात घडलेले आहेत. त्यामुळे येथे अनेकदा वादाचे प्रसंग उद्‍भवलेले आहेत. अशी परिस्थिती असताना सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात येत असलेल्या बांधकामामुळे या परिसरातील व्यावसायिक, नागरिक व अन्य पादचारी व वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून हे सुशोभिकरण थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी दत्तात्रय सुतार, ऋषिकेश सुतार, प्रशांत सुतार, संतोष पवार, कुणाल थोरात, संतोष कुंभार, प्रवीण जाधव, प्रथमेश भोने, वैभव चव्हाण, विनायक सुतार आदी उपस्थीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT