कोल्हापूर

जाहिरात बातमी

CD

06314
कोल्हापूर : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

कोल्हापूर कँन्सर सेंटरतर्फे
तंबाखू विरोधी दिनी पदयात्रा
कोल्हापूर, ता. १ : जागतिक ‘तंबाखू विरोधी दिवसा’निमित्त बुधवारी कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे तंबाखू सेवनाविरोधी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या वेळी कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या आणि शरीराला हानिकारक असलेल्या तंबाखूसह सर्वच व्यसनांपासून दूर रहा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या अशा प्रबोधनाच्या उपक्रमात रोटरी क्लब नेहमीच तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सहभागी होणार असल्याची ग्वाही रोटरीचे इलेक्ट गव्हर्नर नासीर गोरसादवाला यांनी या वेळी दिली.
ऐतिहासिक दसरा चौकातून पदयात्रेस सुरुवात झाली. हलगी कैताळच्या ठेक्यात, यमाची वेशभूषा केलेल्या व्यक्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर चौक आदी शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती करत आलेल्या या रॅलीची सांगता दसरा चौकात झाली.
शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशनचे विश्‍वस्त डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘‘तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ क्षणिक आनंद आणि जीवनशैली म्हणून एक मानवी व्यसन बनले आहे. त्यापासून दूर राहिल्यास जीवन अधिक सुखकर जगता येईल.’’ कॅन्सरतज्ज्ञ व कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालिका डॉ. रेश्मा पवार म्हणाल्या, ‘‘तंबाखू सेवनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचीसुद्धा तितकीच संख्या आहे. कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाला आपल्या जीवनातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी दृढ निश्चय करूया.’’ कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सूरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. या वेळी डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे, डॉ. किरण बागुल, डॉ. नीलेश धामणे, करवीर रोटरीचे प्रेसिडेंट उदय पाटील यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brazil Drug Raid : पोलिसांची ड्रग्ज माफियांवर सर्वात मोठी कारवाई, छाप्यादरम्यान १३० जणांचा मृत्यू; सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला? महिलांमध्ये संभ्रम, खात्यावर कधी जमा होणार पैसे?

World Cup 2025: भारत - ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी नवी मुंबईचं स्टेडियम हाउसफुल; पण पाऊस घालणार खोडा?

Cardiologist's Warning: मधुमेहाला आमंत्रण देणारे 4 पदार्थ घरात ठेवू नका- कॉर्डीओलॉजिस्टने शेअर करत दिली माहिती

Latest Marathi News Live Update : सरकारने दिलेला शब्द पाळावा- मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT