कोल्हापूर

मंगळवेढा शिवेसनेचे कोल्हापुरात आंदोलन

CD

06365

नकुशा मदने खून प्रकरणातील
संशयित आरोपींना अटक करा

‘मंगळवेढा शिवसेना’चे आयजी कार्यालयासमोर धरणे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः पडोळकरवाडी (ता. मंगळवेढा) येथील नकुशा मदने खून प्रकरणातील संशयित आरोपी १४ महिने झाले तरीही मोकाट आहेत. त्यांना अटक करा, पोलिस निरीक्षक रणजित माने यांना निलंबित करा, यासह अन्य मागण्यांसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आजपासून सुरू झाले. मंगळवेढा शिवसेना शहर समन्वयक नारायण गोवे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
संत दामाजीनगर येथील चार वर्षांच्या बालकाचे अपहरण होऊन सहा महिने झाले तरीही त्याचा शोध लागलेला नाही. तालुक्यातील घरफोड्यांचे प्रमाण वाढले असूनही तपास होत नाही. खोट्या गुन्ह्याचा फेरतपास व्हावा, यासह इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू झाल्याचे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत निरीक्षक माने यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवसेना समन्वयक नारायण गोवे, प्रहार तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, राहुल हेंबाडे, अमोगसिद्ध काकणकी, अशोक शिवहारण, प्रतीक किल्लेदार, चंद्रशेथक कोंडभैरी, दामाजी मेटकरी यांच्यासह इतरांचा आंदोलनात सहभाग असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

SCROLL FOR NEXT