कोल्हापूर

खुनी हल्ला फॉलोअप

CD

२४ तासांनंतर एकही अटक नाही
निवृत्ती चौकातील खुनी हल्ला; पोलिसांची पथके रवाना, जखमींची प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः निवृत्ती चौकात पाठलाग करून दोघांवर तलवार हल्लाप्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पहाटेपर्यंत पोलिसांनी गगनबावड्यासह परिसरातील जंगलात कोम्बिग ऑपरेशन राबवले आहे. जिह्यात चार पथके संशयित हल्‍लेखोरांचा तपास करीत आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असून, काल रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बाबातची फिर्याद दाखल झालेली आहे.
बोंद्रेनगरातील पूर्ववैमनस्यातून काल निवृत्ती चौकात भर दुपारी प्रकाश बोडके आणि संभाजी फाले (दोघेही रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) यांच्यावर तलवारीने खुनी हल्ला झाला. दोघांवरही खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. फाले याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दहा जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांची नावेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. मात्र, त्यापैकी एकाचाही शोध घेणे पोलिसांना २४ तासांनंतरही शक्य झालेले नाही. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली म्हणून त्यांचे पथक, गुन्हेगारी टोळ्या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत म्हणून त्यांचे पथक आणि काही हद्द करवीर पोलिस ठाण्याची असल्यामुळे त्‍यांचेही पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचेही पथक हल्लेखोरांचा शोध जिल्ह्यातील ठिकठिकाणी घेत आहेत.

चौकट
गगनबावड्याकडेही शोधमोहीम
हल्‍लेखोरांचे हितसंबंध गगनबावडा येथील धनगवर वाड्याशी संबंधित असल्यामुळे तेथेही शोधमोहीम सुरू आहे. हल्लेखोर घटनेनंतर मोटारीतून गगनबावड्याकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे तेथेही तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT