कोल्हापूर

कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहन गोखले

CD

06412
मोहन गोखले, अनिल भालेकर, चंद्रकांत कांडेकरी, एम. बी. कुंभार

‘सिव्हिल इंजिनिअर्स’च्या
अध्यक्षपदी मोहन गोखले
उपाध्यक्षपदी अनिल भालेकर; एम. जी. कुंभार खजानीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : येथील कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या सन २०२३-२०२४ या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. यात अध्यक्षपदी मोहन गोखले, उपाध्यक्षपदी अनिल भालेकर, खजानिसपदी एम. जी. कुंभार, तर सचिवपदी चंद्रकांत कांडेकरी यांची निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे मावळते अध्यक्ष संजय मांगलेकर होते. या वेळी ज्येष्ठ संचालक सुनील पोवार, उपाध्यक्ष राजेंद्र लाड, संतोष मंडलिक, जितेंद्र लोहार, विजय पाटील, सुजित भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ही महानगरपालिका नगररचना, प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्था कार्यान्वित असून महानगरपालिका, प्राधिकरण, नगररचना विभागात सभासदांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम करत आहे. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. तज्‍ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात, अशी माहिती गोखले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT