कोल्हापूर

एसटी कॉंग्रेस

CD

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे
वेतन, भत्ते देण्याची मागणी

‘इंटक’चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

कोल्हापर ,ता. ३ ः एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी झाल्याने करार पद्धत रद्द करून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते सेवा सवलती व थकबाकीची रक्कम द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अशी माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेला मान्यता मिळण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत झालेल्या करारात एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन दिले जात होते. परंतु १९९६ पासून २०१६ पर्यंत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेसोबत झालेल्या कामगार करारात एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत योग्य वेतनवाढ न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे करार रद्द करून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन देण्याची मागणी करीत आहेत.
२०१६ ते २०२० व २०२० ते २०२४ या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे कामगार करार होणे अपेक्षित होते परंतु कामगार संघटनेच्या नाकर्तेपणामुळे वेतनवाढ झालेली नाही, असे तिगोटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT