कोल्हापूर

सकाळ नाट्य महोत्सव

CD

पडदा आजच्या टुडे १ अँकर बातमीतून
-
पोस्टर ः 07673
-
उद्घाटनाचा मुख्य फोटो- ७७२२.
-
कॉफी वुईथ सकाळ छोटा फोटो- 07674
........

‘तू तू मी मी’ने उघडला नाट्यमहोत्सवाचा पडदा
कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद, आज रंगणार ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः रसिकांच्या उदंड प्रतिसादातच ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चा पडदा आज उघडला. ‘तू तू मी मी’ या पहिल्याच नाटकाला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दी झाली.
दरम्यान, महोत्सवाची मोजकीच तिकिटे शिल्लक असून, रोज सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नाट्यगृहावर तिकिटे उपलब्ध केली आहेत. रोज रात्री साडेनऊला प्रयोग होणार आहेत.
सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, अभिनेता भरत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन झाले. ‘सकाळ''च्या वतीने राज्यभरातील विविध ठिकाणी यंदा नाट्य महोत्सव होत असून येथून पुढे प्रत्येक वर्षी हा महोत्सव सर्वत्र आयोजित केला जाईल, असे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सांगितले. यावेळी चितळे डेअरीचे सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, चितळे समूहाच्या मंजिरी गद्रे, घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे, तनिष्क ज्वेलर्सचे प्रसाद कामत, जय कामत, शिवसमर्थ को-ऑपरेटीव्ह बॅंकेचे व्यवस्थापक प्रताप पाटील, ऐश्वर्या शिंदे, निखिल जाधव, कमलाकर सातपुते, रुचिरा जाधव-निंबाळकर, ‘सकाळ''चे सरव्यवस्थापक रुपेश मुतालिक, ‘सकाळ''चे उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर आदी यावेळी उपस्थित होते.
महोत्सवाच्या निमित्ताने केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग येथे रंगला. विविध चौदा भूमिका साकारत भरत जाधव यांनी एका रंगतदार प्रयोगाची अनुभूती रसिकांना दिली. चितळे डेअरी महोत्सवाचे मुख्य प्रायोजक, तर सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), माई ह्युंदाई, दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) हे आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ९५६१६२६६६५ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. काही जागा राखीव आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांचा गुरूवारी (ता.८) महोत्सवाच्या वतीने विशेष सन्मान होणार आहे.

भाग्यवान रसिकांना बक्षीसे...
‘माई ह्युंदाई’च्या वतीने उपस्थित प्रेक्षकांमधून रोज तीन भाग्यवान रसिकांची निवड होणार आहे. त्यातील विजेत्यांना ‘माई ह्युंदाई’कडून आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ९) ‘माई ह्युंदाई’च्या शोरूममध्ये होणार आहे.
-------
चौकट
महोत्सवात आज व उद्या...
बुधवार (ता. ७) : एका लग्नाची पुढची गोष्ट
गुरुवार (ता. ८) : नियम व अटी लागू
-----------
चौकट
तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती रुपये)
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्रा

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT