कोल्हापूर

मनपाचा रस्ते डांबरीकरण, क्रॉक्रिटीकरणाचा घाट

CD

इचलकरंजी महापालिका वापरणे
----------
मनपाचा रस्ते डांबरीकरण, क्रॉक्रिटीकरणाचा घाट
इचलकरंजीत निविदा प्रक्रिया झाल्यानंतर मक्तेदारांना कार्यादेश देण्याच्या हालचाली
इचलकरंजी, ता. ६ ः पावसाळा तोंडावर असताना महापालिका प्रशासनाकडून रस्ते डांबरीकरणासह काँक्रिटीकरणाचा घाट घातला जाण्याची शक्यता आहे. सुमारे साडे चार कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मक्तेदारांना कार्यादेश देण्याबाबतच्या हालचाली सुरु आहेत. कार्यादेश दिल्यानंतर ९० दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्याचे कामे केल्यास ती दर्जेदार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांसह गटारींची कामे करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे होत आहे.
इचलकरंजी महापालिकेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना यातून एकूण ८४ कामांना मंजुरी मिळाली आहे. एकूण १५ कोटी खर्चाची कामे आहेत. यातील एकूण १० कोटी रुपयांची कामे रस्ते व गटारींची आहेत. ३२ कामेही ४ कोटी ५६ लाख रुपये खर्चाची रस्ते डांबरीकरण, मजबुतीकरण व काँक्रिटीकरण अशी कामे आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तथापि, कागदपत्रांची अद्याप छाननी झालेली नाही. त्याची प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर या कामांचा मक्तेदारांना कार्यादेश देण्याची शक्यता आहे.
वास्तविक रस्ते असतील अथवा गटारी असतील, दोन्ही कामे पावसाळ्यात केल्यास ती दर्जाहीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर ही कामे करणे योग्य ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ७ जून २०१६ च्या रस्ते कामांबाबत परिपत्रक आहे. डांबरीकरणाची कामे ही साधारणपणे १० मे पर्यंतच करावीत, असे त्यामध्ये नमूद आहे. याचा अर्थ पावसाळ्यात रस्ते काम करण्यावर निर्बंध असणार आहेत. पावसाळ्यात ही कामे केल्यास ती सुमार दर्जाची होणार आहेत. त्यामुळे या कामावरील कोट्यावधींचा निधी वाया जाण्याची भिती आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
------
शासनाच्या परिपत्रकानुसार महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी. रस्त्यांसह गटारींच्या कामांचे कार्यादेश हे पावसाळ्यानंतरच द्यावेत. घाईगडबडीने कार्यादेश देवून कामाची सुरुवात केल्यास होण्याऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल. त्यामुळे याबाबत दिवाणी कारवाई करण्यात येईल.
शशांक बावचकर, सचिव, प्रदेश काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT