कोल्हापूर

जिल्‍हा परिषदेत स्‍वराज्य गुढी

CD

07721
उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी
प्रयत्‍न करुया ः मंत्री केसरकर

शिवराज्याभिषेक सोहळा; स्‍वराज्य गुढीची उभारणी

कोल्‍हापूर,ता.६:छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा कोल्‍हापूर जिल्‍ह्याला वारसा लाभला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा उत्कृष्ट जिल्हा बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागलकर हाऊस येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्याचा कार्यक्रम झाला, यावेळी पालकमंत्री केसरकर दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, शिल्पा पाटील, आशा उबाळे संयोगिता चव्हाण, सई चव्हाण उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील आशा स्वयंसेविका तसेच नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे व अन्य कलाकारांनी शिवचरित्रातील निवडक प्रसंगांचे नृत्य- नाट्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. लाठीकाठीची प्रात्यक्षिके झाली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल्या अष्टप्रधान मंडळ व मावळ्यांच्या वेषभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT