कोल्हापूर

विधानसभेच्या पाच जागा जिंकायच्याच

CD

8602
...

लोकसभेसह विधानसभेच्या पाच जागा जिंकूया

वर्धापनदिनानिमित्त जिल्हा राष्‍ट्रवादीने घेतली शपथ

कोल्‍हापूर, ता.१०: ‘आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया’, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘१९९९ पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचा प्रभाव आहे. येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचा झेंडा सगळ्याच संस्थांवर फडकवूया. निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न म्हणजे पराभवाची मानसिकता आहे.’
आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात किमान सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजेत. यादृष्टीने कंबर कसून कामाला लागू या. पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एकसंघपणे काम करूया.’
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ‘येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा यासाठी सर्वांनी कामाला लागावे.’
यावेळी माजी आमदार राजीव आवळे, गोकुळ संचालक युवराज पाटील, प्रा. किसनराव चौगुले, केडीसीसी संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, बिद्रीचे संचालक पंडितराव केणे, युवराज वारके, मधुकरराव जांभळे, राजेश लाटकर, महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे, डॉ. आशा शितोळे, शिरीष देसाई,नितीन जांभळे, विकास पाटील,विठ्ठल चोपडे, संभाजीराव पवार, चंगेजखान पठाण उपस्थित होते.
...

पडळकर, राणे यांना आवर घाला

मुश्रीफ म्हणाले, ‘आमचे नेते शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे एकेरी भाषेत बोलत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी आणि आवर घालावा. शरद पवार यांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जात आहेत, हे सगळं अखंड महाराष्ट्रासह ऊभा देश पहात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला आमच्या शुभेच्छाच आहेत. कारण, त्यामधून गोरगरिबांची सेवा होणार आहे. परंतु, अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय हे होणार नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT