कोल्हापूर

काकडी, वरण, गाजर आणि खमंग भाजी

CD

08787
कोल्हापूर : काकडीची आवक कमी झाली आहे.

वरणा, काकडी महागली
मेथी, पालक, पोकळाच्या दरातही पाच ते दहा रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : लग्नाची गडबड सुरु असली तरी मंडईत काकडी, वरणा, बेळगावी गाजर मात्र गायब झालं आहे. वरणा, काकडी आहे, पण ८० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर गेले आहेत. लग्न समारंभात मिश्र भाजीमध्ये वरणा, गाजर, दोडका, वांगी, बिनीसह अन्य भाज्या एकत्रित केल्या जातात. कोशिंबीरीकरीता गाजर, काकडीचा वापर होतो. लग्न असो की, कुठलाही सण असो. या भाज्यांना अधिक मागणी असते. नेमकं या आठवड्यात या भाज्यांची आवक कमी झाली. त्याबरोबर मेथी, पालक, पोकळा आदी भाज्यांच्या पेंड्यांच्या दरात ही पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली. यावर्षी मार्च ते मे अखेर तीव्र उन्हाळा जाणवला. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे भाजीपाल्याच्या आवकेत घट झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.
...
चौकट
फळभाजी दर (प्रतिकिलो रुपये)
हिरवी वांगी *४०
निळ्या रंगाची वांगी *२०
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *२० रुपयाला दिड किलो
हिरवा वाटाणा * १००
दोडका *४०
हायब्रीड गवारी *४०
बेळगावी गाजर *६०
बिनीस *२००
फ्लॉवर *२०
कोबी *१०
भेंडी *४०
कारली *४०
हिरवी मिरची *६०
््आल्लं *२००
काटेरी काकडी *८०
हेळवी कांदा *१०/१५/२०
बटाटा *२०
...
चौकट
भाजीपाला (प्रति पेंडी)मेथी *२५
कोथींबीर *२०
पोकळा *१५
शेपू *१५
लालमाट *१५
तांदळी शेंग *१५
आंबाडा *१०/१५
चुका *१५
पालक *१०/१५...

सोने-चांदीचे दर
सोने (प्रति तोळा) : ६१,५८५
चांदी (प्रति किलो) : ७४,५००
...

घोडकेंच्या चटणीची चवच भारी..
कोल्हापूर, ता. ११ : लक्ष्मीपुरी मंडई रविवारी भरते. या मंडईत सर्व साक्षी गणेश मंदिरासमोर घोडकेंचा चटणीचा स्टॉल असतो. अन्यवेळेला हा स्टॉल लक्ष्मीपुरी मंडईच्या आतील बाजूस असतो. रविवारी या स्टॉलवरुन ५०० ते ६०० किलो घरगुती स्पेशल चटणीची विक्री होते. अगदी ही स्पेशल चटणी आता पुण्यापर्यंत पोहोचली आहे. या चटणीला बंगळूरचे वेध लागले आहेत. अशा या चटणीला ५० वर्षे पूर्ण झाली, हे विशेष.
रविवार असो की, अन्यवेळी. ही चटणी घेण्यासाठी मोलमजुरी करणारे, हातावरचे पोट असणारे सर्वसामान्य कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात येतात. मयुर घोडके म्हणाले, ‘आजी लक्ष्मीबाई घोडके यांनी ५० वर्षांपूर्वी लक्ष्मीपुरी मंडईत चटणी विक्री करण्यास सुरवात केली. तेव्हा बुट्टीतून ही चटणी तयार करुन आजी लक्ष्मीपुरी मंडईत येत असे. आजोबा शामराव घोडके ही कंडक्टर होते. ते निवृत्त झाल्यानंतर काय करायचे, असा प्रश्‍न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा आजोबांच्या फंडमधून जे पैसे आले, त्या पैशातून आजीने चटणीचा डंग, पिठाची गिरण टाकली. एका छोट्या व्यवसायाला सुरवात झाली. आज ५० वर्षे पूर्ण झाली. आता तिसरी पिढी या चटणी व्यवसायात कार्यरत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT