कोल्हापूर

दृष्टीदान दिन

CD

सीपीआर रुग्णालयात नेत्रदान पंधरवडा
कोल्हापूर , ता. १४ ः ‘‘नेत्रदानही काळाची गरज आहे जास्तीजास्त लोकांनी नेत्रदान केल्यास अनेक अंधव्यक्तींना त्यांची दृष्टी परत मिळवून देता येणे शक्य होईल. त्यामुळे नेत्रदानातून अंध व्यक्तींच्या जगण्याला नवी उभारी मिळू शकेल, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्‍ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी केले.
सीपीआर रुग्णालयात नेत्ररोगतज्‍ज्ञ डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. नेत्रदान विषयी जनजागृती करण्याचा भाग म्हणून नेत्रदान पंधरवडाही साजरा करण्यात आला. यात नेत्रदानाविषयी महत्त्‍व सांगण्याबरोबर, नेत्रदानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी नेत्ररोग तज्‍ज्ञांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांमध्येही नेत्रदान विषयी जागृती करण्यात येत आहे. यातून नेत्रदानाला ग्रामीण भागातही प्रतिसाद वाढेल असा, आशावाद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केला. नेत्रविभाग प्रमुख डॉ. अतुल राऊत यांनी गेल्या वर्षभरात सीपीआरसह विविध ठिकाणी झालेल्या नेत्रदान उपक्रमाची माहिती दिली. नेत्रविभाग प्रमुख डॉ. सुजाता वैराट, डॉ. अभिजित ढवळे, डॉ. प्राजक्ता पाटील, समुपदेशक जॉन लोखंडे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT