कोल्हापूर

‘अकरावी’ प्रवेशाचे संकेतस्थळ बंद राहिल्याने पालकांचा संभ्रम

CD

09413

अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बंद राहिल्याने संभ्रम
१२० विद्यार्थ्यांनी निवडली शाखा; दहावी गुणपत्रिका मिळाल्याने प्रक्रिया गती घेणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः बारा दिवसांपूर्वीपासून शहरस्तरीय अकरावी प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात दहावी उत्तीर्ण ६१२३ विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जाचा दुसरा भाग भरण्याचा टप्पा आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झाला. मात्र, हा टप्पा सुरू होण्यापूर्वी सकाळपासून संकेतस्थळ बंद राहिल्याने अथवा अर्ज भरता आला नसल्याने विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम निर्माण झाला. दुपारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत १२० विद्यार्थ्यांनी शाखा निवड पूर्ण केली.
दहावीच्या गुणपत्रिकांचे आज शाळांमध्ये वाटप झाले. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांसमवेत शाळा सोडल्याचा दाखलाही देण्यात आला. शाळांच्या सूचनाफलकांवर गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव केला होता. मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणपत्रिकांचे वाटप झाले. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने फुलला. या मूळ गुणपत्रिका भरल्याने आता अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकमधील प्रवेश प्रक्रियेची गती वाढणार आहे. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे शहरस्तरीय अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बंद राहिल्याचे समजले नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. संकेतस्थळ बंद राहणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालय अथवा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने आधी देणे आवश्‍यक होते, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली. दुपारनंतर संकेतस्थळ पूर्ववत सुरू झाले. त्यात ८६ विद्यार्थ्यांनी विज्ञान, तर ३४ जणांनी वाणिज्य इंग्रजी माध्यम या विद्याशाखेची निवड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT