कोल्हापूर

राजर्षी शाहू व्याख्यानमाला

CD

राजर्षी शाहू व्याख्यानमाला बुधवारपासून ः रेखावार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त विविध विषयांवरील राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे २१ ते २५ दरम्यान सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होईल. बुधवारी (ता. २१) ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांचे ‘रशिया-युक्रेन युद्ध व त्याचे परिणाम’ या विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेला सुरवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
रेखावार म्हणाले, ‘गुरुवारी (ता. २२) डॉ. विलास पवार यांचे ‘राजर्षी शाहू महाराजांच्या प्रशासकीय सुधारणा’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. अवनिश पाटील अध्यक्षस्थानी असतील. शुक्रवारी (२३) प्रा. जी. ए. उगले (पैठण) यांचे ‘सत्यशोधक समाज ः काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी डॉ. जयसिंगराव पवार असतील. शनिवारी (२४) किशोर बेडकिहाळ (सातारा) यांचे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे समकालीन महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रा. रणधीर शिंदे असतील. रविवारी (२५) डॉ. शिवाजी पाटील (सातारा) यांचे ‘भारतीय राज्यघटनेचा मूलभूत संरचना सिद्धांत आणि लोकशाही’ या विषयावर व्याख्यान होईल. ही सर्व व्याख्याने समाजोपयोगी आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेखावार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT