कोल्हापूर

नावेद मुश्रीफ

CD

नावेद मुश्रीफ इडी समोर जाणार
न्यायालयाचे आदेश ः वकीलांच्या तक्रारीची घेतली दखल
कोल्हापूर ता. १४ ः सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी सक्त वसुली संचानलायाने (इडी) दाखल केलेल्या खटल्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे पुत्र व गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ हे सहकार्य करीत नसल्याची तक्रार इडीच्या वकीलांनी आज न्यायालयात केली. याची दखल घेत न्यायालयाने नावेद यांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने दोन दिवसात नावेद इडीच्या चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान इडीने दाखल केलेल्या खटल्यापासून संरक्षण मिळावे म्हणून श्री. मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलाने जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल प्रलंबित असताना आज न्यायालयानेवरील आदेश दिल्याने श्री. मुश्रीफ व त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या नावाखाली कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीवरून इडी या प्रकरणाचा तपास करीत आहे. यात नावेद मुश्रीफ यांना यापूर्वीच इडीने समन्स बजावले होते तरीही ते चौकशीला येत नाहीत, असा दावा आज इडीच्या वकीलांनी न्यायालयात केला. त्यावरून न्यायालयाने या प्रकरणीच्या तपासात नावेद यांनी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT