कोल्हापूर

‘पंचगंगा’ सुरु, ‘कृष्णा’ बंद

CD

‘पंचगंगा’ सुरू, ‘कृष्णा’ बंद
इचलकरंजीतील पाणीपुरवठा विस्कळीतच; गळती काढण्याचे काम सुरू

इचलकरंजी, ता. १६ ः येथील पंचगंगा नदी अंशतः प्रवाहित झाली आहे. त्यामुळे आज दुपारी मनपाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरू केला आहे. तर दुसरीकडे गळती काढण्यासाठी कृष्णा नदीतील उपसा बंद केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी शहरातील पाणी पुरवठा विस्कळतीच राहणार आहे.
पंचगंगा नदीतील पाणी पातळी खालावली होती. साचलेल्या पाण्यात दूषित पाणी मिसळल्याने दर्प येत होता. त्यामुळे खबरदारी घेत मनपाने पंचगंगा नदीतील पाणी उपसा काही दिवस बंद ठेवला होता. शिरढोणजवळ गळती असतानाही कृष्णा योजना सुरू ठेवली होती. या योजनेवरच शहरातील पाणीपुरवठा सुरू होता. योजनेतून उपलब्ध होणारे पाणी आणि शहराती गरज याचे प्रमाण खूपच व्यस्त होते. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धरणातून पाणी सोडले आहे. त्यामुळे पंचगंगा नदी काही अंशी प्रवाहित झाली आहे. नदीपात्रात साचलेले पाणी पुढे प्रवाहित झाले आहे. आता नवीन पाणी आले आहे. त्यामुळे आजपासून मनपाने पंचगंगा नदीतून उपसा सुरु केला आहे. दररोज नऊ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. पंचगंगेचा आधार मिळाल्यामुळे आता कृष्णा योजनेच्या गळतीचे काम आजपासून हाती घेण्यात आले.
गळतीचे काढण्याचे काम दोन दिवस चालणार आहे. तोपर्यंत कृष्णा नदीतील उपसा बंद राहणार आहे. शिरढोणजवळ ही गळती लागली आहे. गळतीचे प्रमाण लहान आहे. गळती काढण्याबाबत ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आजपासूनच हे काम सुरु केले असून दोन दिवसात गळतीचे काम पूण होईल. त्यानंतर पुन्हा कृष्णा नदीतून उपसा सुरु केला जाईल. त्यामुळे तुर्तास तरी शहरातील पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT