कोल्हापूर

बनशंकरी मंदिरात विविध कार्यक्रम

CD

बनशंकरी मंदिरात विविध कार्यक्रम
इचलकरंजी : गावभागातील बनशंकरी देवी मंदिरात ज्येष्ठ अमावस्येनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. १८) ज्येष्ठ अमावस्या असून चौंडेश्वरी देवी मुखवटा उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त गावभागमधील लिंगणगुडीनजीकच्या बनशंकरी देवी मंदिरात सकाळी सात वाजता देवीस अभिषेक घालून त्यानंतर अलंकार पूजा करण्यात येणार आहे.सकाळी 10 वाजता श्री चौंडेश्वरी देवी पालखीचे आगमन होणार असून यावेळी चौंडेश्वरी देवी व बनशंकरी देवी भेटीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर प्रसाद वाटप व रात्री 8 नंतर फडके व म्हेतर यांचे चौंडेश्वरी देवी मुखवट्यांचे आगमन होणार आहे.
--------------------
सॉफ्टवेअरमध्ये कर बदलाची मागणी
इचलकरंजी : वाढलेला मालमत्ता कर आयुक्तांच्या आदेशाने कमी केला असला तरी कर भरण्यासाठी असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये अजूनही जुनाच कर दाखवत आहे. त्यामध्ये सुधारणा करून कमी झालेला घरफाळा दिसावा या मागणीचे निवेदन इनामच्यावतीने प्र. उपायुक्त केतन गुजर यांना दिले. तीन दिवसांत काम पूर्ण होईल. त्यानंतर ऑनलाईन घरफाळा भरण्याचे काम सुलभ होईल. तसेच वाढीव रक्कम प्रिंट झालेल्या घरफाळा पावत्यावर शिक्का मारला असून त्यामध्ये वाढलेले कर वगळून भरण्याचे आवाहन श्री. गुजर यांनी केले. ज्या मिळकतधारकांनी वाढीव दराने घरफाळा भरला आहे त्यांची रक्कम पुढील घरफाळ्यातून वजा करण्यात येणार असल्याचे सांगितले. राजु कोन्नुर, राम आडकी, उदयसिंह निंबाळकर, संजय डाके आदी उपस्थित होते.
---------------------
वारकऱ्यांना भाकरी वितरितचा निर्धार
इचलकरंजी : दुर्गामाता प्रतिष्ठानतर्फे आळंदी ते पंढरपूर दिंडी यात्रा मार्गावर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी तीस हजार भाकरी आणि शिधा वितरण करण्याचा निर्धार केला आहे. कार्यक्रम रविवारी (ता.१८) काळा मारुती मंदिरातून पाठवण्याचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली. वारकऱ्यांसाठी दुर्गामाता प्रतिष्ठान नऊ वर्षे हा उपक्रम राबवत आहे. हे दहावे वर्ष आहे. काळा मारुती मंदिरात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमासाठी माजी आमदार सुरेश हाळवणकर, विष्णुपंत ठोंबरे, सदाशिव उपासे महाराज, नेतले महाराज, फातले महाराज, पुरूषोत्तम मुळे महाराज, तानाजी रावळ, महेश कवडे तसेच जवाहर छाबडा आदींच्या सहकार्य लाभल्याचे संयोजकांनी सांगितले.
--------------------------
09724
अध्यक्षपदी रवी कांबळे
इचलकरंजी : इचलकरंजी शहर दलित पॅंथरच्या शहर अध्यक्षपदी रवी कांबळे यांची निवड केली. माजी शहराध्यक्ष युवराज जाधव यांच्या मृत्यूमुळे जागा रिक्त होती. नूतन अध्यक्षपदासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये रवी कांबळे यांची एकमताने निवड केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक कांबळे होते. शशिकांत ओहळ, गिरधर कांबळे, मोहन नाईक, रमेश शिंदे, गौतम कांबळे, रियाज शेख, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT