कोल्हापूर

‘गोडसाखर’चा इथेनॉल प्रकल्प दृष्टीपथात

CD

‘गोडसाखर’चा इथेनॉल प्रकल्प दृष्टीपथात
रजिस्ट्रेशन सक्सेसफूल; पुढील कार्यवाहीला केंद्र शासनाचा हिरवा कंदील
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या (गोडसाखर) इथेनॉल प्रकल्पाला चालना मिळाली आहे. कारखान्याने प्रकल्पासाठी केंद्राच्या पोर्टलवर ऑनलाईन केलेला अर्ज केंद्राने मंजूर केला असून पुढील कार्यवाही करण्यास हिरवा कंदीलही दिल्याचे सांगण्यात आले.
गोडसाखर कारखान्यातर्फे येत्या गळीत हंगामापासून इथेनॉल प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन गतीने सुरु आहे. केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्पासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले आहे. केंद्राच्या पोर्टलवर कारखाना व्यवस्थापनाने प्रकल्पाच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन केले होते. त्याला केंद्राने हिरवा कंदील दाखवला असून पुढील कार्यवाही सुरू करण्याची सूचना दिली आहे. केंद्राकडून हा अर्ज प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे येईल. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्‍यांना प्राप्त होईल. जिल्हाधिकारी या प्रकल्पासंदर्भात जनसुनावणीची तारीख निश्‍चित करतात. या सुनावणीचा अहवाल पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून केंद्राला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पासाठीचे आवश्यक अर्थसहाय्याचे नियोजन केंद्राकडून मागवले जाते. जिल्हा बँकेने गोडसाखर कारखान्यासाठी गळीत हंगामपूर्व ३५ कोटींचे कर्ज वर्ग केले आहे. आता भविष्यात इथेनॉल प्रकल्पासाठीही बँक अर्थसहाय्य करण्यास सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
गोडसाखर कारखाना २०२१ मध्ये उशिरा सुरू झाला तर २०२२ मध्ये पूर्ण हंगाम बंद राहिला. आर्थिक अडचणीतील या कारखान्याची गतवर्षी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. त्यानंतर कारखान्यातील मशिनरींची अवस्था पाहून नूतन संचालक मंडळाने गतवर्षी कारखाना बंदच ठेवण्याचा निर्णय घेवून २०२३ चा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी लागणारे आवश्यक अर्थसहाय्य केडीसीसी बँकेने पंधरावड्यापूर्वीच दिले आहे. ही रक्कम तोडणी व वाहतूकदारांच्या करारासाठी वापरण्यात येणार असून उर्वरित रक्कम कारखान्यातील मशिनरींच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे बॉयलरचे मोठे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच इतर मशिनरींच्या ओव्हर हॉलिंगची कामेही गतीने सुरू झाली आहेत. बीड भागातील १७५ ऊसतोड टोळ्या व वाहतूकदार यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत. स्थानिक टोळ्यांचे करारही सुरु करण्यात येणार आहेत.
----------------
हसन मुश्रीफ यांचा पुढाकार
दरम्यान, २०१३ मध्ये कारखाना अडचणीत होता तेव्हा आमदार हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने गोडसाखर भाडेतत्त्‍वावर चालवण्यास दिला. आताही केडीसीसीचे अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने गोडसाखरचा हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. गतवर्षीच्या निवडणुकीनंतर श्री. मुश्रीफ, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ गोडसाखरमध्ये सत्तेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT