प्रत्येक गावात १ हजार झाडे लावणार
संजयसिंह चव्हाण; राजर्षी शाहू जयंतीनिमित उपक्रम
कोल्हापूर, ता. १६ : येत्या २६ जूनला राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावात १ हजार झाडे लावण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यात १०२५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ठिकाणी १० लाखांपेक्षा अधिक झाडे लावली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पर्यावरण संतुलन, जलसंवर्धन याला पूरक ठरणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाचे नियोजन केले आहे. या उपक्रमात जिल्ह्यात १०२५ ग्रामपंचायतींत सर्व देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. साधारण १० लाखांपेक्षा अधिकची झाडे यानिमित्त लावली जाणार आहेत. प्रत्येक गावात १ हजार झाडे लावली जाणार आहेत. यासाठी सर्व ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीसाठी खड्डे काढणे, खत उपलब्ध करणे याबाबत सूचना दिल्या आहेत.
वृक्षारोपणासाठी लागणारी रोपे ही सामाजिक वनीकरण विभागाकडून घेतली जाणार आहेत. वनीकरणकडे १३ लाख रोपांची उपलब्धता झाली आहे. त्यांचा मोफत पुरवठा विभागाकडून केला जाणार आहे. गावागावांत लावलेल्या वृक्षांची नोंदही ग्रामपंचायत स्तरावर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी गाव भेटीवेळी या वृक्षरोपणाचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.