09846
केएमटीच्या डिजिटल तिकीट सेवेला प्रारंभ
कोल्हापूर, ता. १६ ः महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत (केएमटी) तिकिटासाठी डिजिटल ॲप उपलब्ध केले आहे. ‘तिकीट ऑन गो’ या सेवेतून मोबाईल ॲपद्वारे तिकीट दिले जाणार आहे. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सहा मार्गांवर देण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता. २०) ही सेवा कार्यान्वित होणार असून,‘तिकीट ऑन गो या कंपनीमार्फत पहिले चार दिवस प्रत्येक प्रवाशास चार तिकिटे मोफत देण्यात येणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते महपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात या सेवेचा प्रारंभ झाला. या ॲपमध्ये प्रवाशांनी प्ले स्टोअरद्वारे मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे. लॉग-इन केल्यानंतर मार्ग, वेळ, बसची मार्गस्थ स्थिती व तिकीट दर दिसणार असून, प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांनी मार्ग, उतरण्याचे ठिकाण भरल्यानंतर तिकीट दर डिजिटल पेमेंट पद्धतीने (गुगल, फोन पे आदी) करता येणार आहे. मोबाईलवर पिवळ्या रंगाचे तिकीट दिसेल. प्रवास करताना बसमधील चार अंकी कोड ॲप्लिकेशनमध्ये टाईप केल्यानंतर तिकीट वैध करून घ्यावे लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर तिकिटाचा रंग हिरवा दिसेल. हे तिकीट दाखविणे बंधनकारक आहे. ॲप वापरण्याबाबतची माहिती व्हिडिओद्वारे दिली आहे. तिकिटाची वैधता ते काढल्यापासून एक तासाची राहणार आहे. सेवा प्रारंभ करताना अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक रवी धुपकर, स्थानक प्रमुख सुनील जाधव, कामगार अधिकारी संजय इनामदार, मंदार पराडकर, लवेश बागाईतकर उपस्थित होते.
या मार्गावर सेवा
-श्री शाहू मैदान आर.के.नगर ते शुगरमील
-श्री शाहू मैदान आर.के.नगर ते शुगरमील (व्हाया जिल्हा परिषद)
-पाचगाव ते कदमवाडी
-स्टँड सानेगुरुजी वसाहत बोंद्रेनगर ते स्टँड
-स्टँड गंगावेश बोंद्रेनगर सानेगुरुजी वसाहत ते स्टँड
-कळंबा शुगरमील ते शिवाजी विद्यापाठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.